जाब
जाब "वहिनी,माझ्या आईला तू उलट कशी बोलू शकतेस?" ©® गीता गरुड. नणंद रेश्मा आईचा कैवार घेत मालतीशी भांडायला अगदी अर्ध्या दिवसाची रजा टाकून आली होती. उन्हातून आली म्हणून मालतीने तिला माठातलं गार पाणी दिलं. "आज लवकर सुटलं ऑफीस?" मालतीनं विचारलं "हे असं आमच्याशी गोडगोड बोलतेस नि आमच्या अपरोक्ष आमच्या आईला..अगदी पोरक्यासारखी वागणूक देतेस. बरोबर ना." जीजी डोळ्याला पदर लावून बसली. "बघ बाई आता तुच काय ते. तू झालीस तेंव्हा दुसरीपण पोरगीच झाली म्हणून हिणवलं सासूसासऱ्यांनी पण तुम्हा लेकींनाच गं माझी कणव." "आई,तू अजिबात रडू नकोस. तुझी लेक जीवंत आहे अजून. खडसावून जाब विचारते की नाही बघ. कुणाचं मिंध रहायची गरज नाही तुला. पेंशन आहे चालू तुझी. यांच्या जीवावर नाही जगत तू." भरल्या गळ्याने रेश्मा आईचे डोळे पुसत म्हणाली. "आत्या काय चाललय तुझं. खालपर्यंत आवाज येतोय," नुकतीच घरात पाऊल टाकत असलेली किमया आत्याजवळ आपली स्याक ठेवत म्हणाली. "या पोरीला माझा आवाज सहन होत नाही गं रेशम. आता तुझाही सहन होत नाहीए बघ."जीजी असं म्हणत परत रडू लागली....