पोस्ट्स

जुलै, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आज्जीसासू

इमेज
 या पावसात आजीसासू आठवते, पाठीमागच्या खोलीत निजणारी. ही आजीसासू म्हणजे माझ्या सासूची आई. एका छोट्याशा आयतासारखी खोली होती तिची त्यात भिंतीला लागून भाताच्या मुडी एकावर एक रचून ठेवलेल्या असायच्या. त्याबाजूला जरा अंतर ठेवून तिच्या बऱ्याच गोधड्या एकावर एक ठेवलेल्या असायच्या.  एका तरटावर तिची चादर, त्यावर कांबळं, गोधडी असं अंथरुन ती निजायची, पांघरायला गोधडी घ्यायची. बाजुला आयोडेक्स नि अम्रुतांजन बामाची डबी असायची.  ती डबी नातवांनी आणून दिली की ती नातवांच कौतुक करायची.माझो नातू माका बामाची डबी हाडून दिता असं येणाऱ्याजाणाऱ्यांना सांगायची.  भिंतीला खोरण होतं. त्यात तिची फणी, खोबरेल तेलाची बाटली असायची. आज्जी, चार केसांना तेल लावून मधोमध भांग पाडून ते दोन्ही बाजुंना पुढे घेऊन विंचरत बसे मग त्यांची इवलिशी अंबाडी बांधे, ती अगदी खेळातल्या गोटीसारखी दिसे. आजीचे हात सुरकुत्यांनी भरलेले असायचे, त्यांत रक्त असेल का अशी शंका यायची मला. छोट्याशा पितळेच्या खलबत्त्यात आज्जी चंचीतलं पान, सुपारी एकत्र करून कुटे व ते हिरड्यांनी चघळत बसे. बाहेर रानहळदीला फुलं आलेली असत. हिरव्यागार रानहळदींव...