पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वंशव्रुक्ष

    वंशव्रुक्ष वंशव्रुक्ष ही डॉ. भैरप्पा यांची कादंबरी. डॉ. भैरप्पा हे कन्नड लेखक आहेत. वंशव्रुक्ष या कादंबरीचा अनेक भाषांमध्ये अनुवाद केला गेला आहे.मराठीत उमा कुलकर्णी यांनी या कादंबरीचा अनुवाद केला आहे.  ग्रंथ लिहिणारे सदाशिवराव यांनी एक मोठा पाच खंडांचा ग्रंथ लिहिण्याचा ध्यास घेतला आहे. सदाशिव व राज हे दोघे भाऊ, आईवडिलांच्या म्रुत्युपश्चात मामाच्या घरी वाढतात. मामाची मुलगी नागलक्ष्मी हिच्याशी सदाशिवचं लग्न होतं. राज काही काळ उच्चशिक्षणासाठी परदेशात स्थायिक असतो. त्याचं व नागलक्ष्मीचं ट्युनिंग छान आहे. ती दोघं मामेभावंड आहेत शिवाय बालपणीचे सवंगडी त्यामुळे त्यांच्या गप्पा रंगतात. सदाशिवरावांना मात्र ग्रंथाच्या वेडाने झपाटले आहे. नागलक्ष्मीला एक मुलगा होतो, प्रुथ्वी. दरम्यान सदाशिवरावांची भेट एका पीएचडी विद्यार्थिनीशी होते. करुणारत्ने त्यांनी दिलेल्या माहितीचं टिपण काढण्यात मदत करते, त्यांच्याशी ग्रंथासंबंधी चर्चा करते..यातूनच पुढे ती दोघं लग्न करण्याचा निर्णय घेतात. नागलक्ष्मीला हे कळताच ती सदाशिवरावांशी बोलणं बंद करते. शेवटी सदाशिवराव करुणाला घेऊन वेगळं बिर्हाड थाटतात. ...

केला तुका नि झाला माका

इमेज
 केला तुका नि झाला माका <script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-7389619452372445"      crossorigin="anonymous"></script> ©®गीता गरुड. बबन्या एसटीची वाट बघत भरडावर थांबला होता. सकाळचं कोवळं ऊन मागे सरून निब्बर ऊन जाणवू लागलं होतं. आपल्या आक्काच्या गावाला जायचं म्हणून तो खूष होता. या आक्काची मुलगी आत्ता लग्नाच्या वयाची झाली होती नि तिच्यासाठी स्थळ पहा असा आक्काने बबन्यामागे घोषा लावला होता.  बरं जावयासाठी आक्काच्या अटीही बऱ्याच होत्या..उंचापुरा, देखणा, सरकारी नोकर, शहरातली नोकरी,गावी घरदार, मुंबईला स्वतःच्या नावावरची खोली..अशी मारुतीच्या शेपटीप्रमाणे आक्काची जावयाबाबतीतच्या अपेक्षांची यादी होती.  बबन्याने गावातलीच दोनचार स्थळं पाहिली होती पण आक्काच्या पसंतीस ती मुलं उतरली नव्हती. आक्काची बेबी बीए पास होती. सरकारी जावई केला की तो बेबीला कुठेतरी सरकारी खात्यात नोकरीला चिकटवेलच असा आक्काचा ठाम विश्वास होता.  बाकी काही असो, बबन्याचा आपल्या भाचीवर फार जीव होता. त्याच्या एकुलत्या एका बहिणीची त...

बाईंची मुलं

इमेज
 बाईंची मुलं ©®गीता गरुड. पत्ता शोधत शोधत बकुळा डोंगरेबाईंच्या खोलीवर पोहोचली. डोंगरेबाई घराच्या व्हरांड्याच्या खांबाला लगडलेल्या मोगरीच्या वेलीवरची फुलं काढत होत्या. पांढराशुभ्र चिकनकारीचा पंजाबीड्रेस, सप्तरंगी ओढणी नि त्यावर खुलून दिसणारं बकुळेचं मुखकमल.  "वळखलात बाईंनू?" बाईंचा हात आपल्या हातांनी गच्च धरत बकुळीने बाईंच्या डोळ्यांत पाहिलं. डोंगरेबाई साठीच्या आसपास आल्या होत्या. वयाच्या खुणा देहावर दिसत होत्या. कंबरेला लावलेल्या गच्च पठ्ठ्याने त्यांच्या कंबरदुखीची जाणीव समोरच्यालाही होत होती. "बाईंनू, मी बकुळ..मराठी शाळा, तुळस गाव, वेंगुर्ले." क्षणात बाईंच मन पार मागे गेलं.बाईंना बकुळ आठवली..अगदी सुस्पष्ट. तुळस गावात बाईंची शिक्षिका म्हणून नेमणूक झाली तेंव्हा तिथल्या ग्रामसेवकाच्या ओळखीने त्या शिवलकरांच्या घरी भाडोत्री म्हणून राहू लागल्या. शिवलकरांना मोठे दोन मुलगे होते आणि त्यांच्या पाठीवरची बकुळ. झाडावरून अलगद जमिनीवर पडलेल्या बकुळफुलासारखं रुप होतं तिचं. त्यावेळी सहावीत असावी. बकुळाचं घर छान ऐसपैस होतं. आजुबाजूला झाडंपेडं होती. बकुळाच्या आईने डोंगरेबाईंना त्यांच...

साठवगाठव

इमेज
 साठवगाठव ©®गीता गरुड. "ओ आयकलास काय. माका ती 'सुनेचं राज्य' सिरीअलमधी देखवतत तसली बुट्ट्यावाली साडी व्हयी म्हंजे व्हयी," सरीता बाबल्याच्या कानाशी भुणभुण करत होती. "गो, व्हयता कपाट साडयेंनी भरलला असा तरी नयी साडी  कित्याक व्हयी तुका?"बाबल्याने वैतागतच विचारलं. "माझी मावसभैन,सुमाताई मुंबयसून येव्ची हा. तिका मी हळदीकुकवाचा आमंत्रण दिलय. ती भारीतला पाताळ नेसान येतली. तिका वाटता कामा नये, मिया तिच्यापरीस कमी आसय असा." "गो तुका कमी म्हतल्यान कुनी? असली शोबाजी करुची खेका?" "ता काय नाय. तुमी माका साडयेसाठी पैसे दिलास नाय तर मिया आबांकडे मागतलय. आबा माका नाय म्हनाचे नाय." आबा म्हणजे सरीताचे सासरे. सरीता या घरात यायच्याआधीच त्यांची सहचारिणी हे जग सोडून गेल्याने ते तसे हतबल होते. होता होईल तो मुलाशी व सुनेशी जुळवून घ्यायचं त्यांनी ठरवलं होतं. आबांच्या या कमजोरीचा सरीता बरोबर फायदा उठवत होती. ती नवऱ्याकडून तर पैसे घ्यायचीच शिवाय दारावर मच्छीवाली आली की हातभर लांब सुरमई, सुपभर पसरेल एवढा हलवा तर कधी मुशी घेई. आबांना साद घालून पैसे द्यावयास ...

वैssनी वैssनी वेणी छान छान

इमेज
 वैssनी वैssनी वेणी छान छान ©®गीता गरुड. बेबीचं दहावीपर्यंतचं शिक्षण निसर्गसंपन्न अशा नाटळ गावात झालं. बेबीच्या पुढच्या शिक्षणासाठी आत्याने तिला आपल्या घरी मुंबईला बोलावून घेतलं. बेबी कॉलेजची पाच वर्ष आत्याच्या सांगण्याबरहुकूम वागली. आत्याच्या घरातल्यांचीच नव्हे तर शेजारपाजाऱ्यांचीही मनं बेबीने जिंकली. आत्याकडे राहून बेबीने अभ्यासासोबतच मुंबईतल्या चालीरीती, पावभाजी, बटाटेवडे, सुरळीच्या वड्या यांसारखे नवे पदार्थ शिकून घेतले. आत्याला खरंतर बेबीस सून म्हणून आपल्या घरातच सामावून घ्यायचं होतं. बेबी होतीच तशी लाघवी, प्रेमळ पण बेबीत नि आत्याच्या मुलात,रवीत आत्याला तसं काही आढळून येत नव्हतं..म्हणजे दोघं बोलायची, उठाबसायची, खेळीमेळीने वागायची खरी पण एकमेकांबद्दल प्रेमभावना वगैरे त्यांच्या नजरेत दिसत नव्हती. आत्याने विचार केला, लग्नानंतरही होतंच की प्रेम. पुर्वी तर अक्षता डोक्यावर पडल्यानंतरच नवऱ्याचा चेहरा नवरीला नं नवरीचा चेहरा नवऱ्याला दिसायचा, त्यानंतर प्रेम वगैरे..तरीही व्हायचेच नं संसार..टिकायचीच नं लग्न.  बेबीला आज संध्याकाळी याबाबत विचारायचंच असं तिने मनाशी ठरवलं नि बेबीच्या खोल...

खरी गोम

इमेज
 खरी गोम ©®गीता गरुड. छाया सासरी आल्यापासनं बघत होती. नणंद रजनी कामाच्यावेळी बरोबर पसार व्हायची. काम म्हंटलं की तिचं डोकं धरायचं. छायाची सासूही लेकीचे अति लाड करायची. लेकीला जरा बरं नसलं तरी अस्वस्थ व्हायची. रजनी आपल्या आईच्या हळवेपणाचा नेमका फायदा घ्यायची.  छायाच्या सासूला आमवाताचा त्रास होऊ लागला. तिच्या हातापायाची बोटं आखडू लागली. मरणाची थंडी, त्यात छाया घराबाहेरल्या मोरीत एकटीच भांडी घासत बसायची. रात्रीची झाकपाक होऊन खोलीत जाईस्तोवर खूप उशीर झालेला असायचा. छायाचा नवरा विश्वास मग तिच्यावरच चिडायचा. "छाया, गो वाजले किती? बारा वाजेतागद भांडी घासीत रव्ह. पटापटा कामा आटपूक व्हता काय तुका! आता निजाचा कवा नि कामार जाव्चा कवा?" "तुमका काय वाटता, मिया आस्ते आस्ते कामा करतय. गोगलगाय असा काय मिया. भाकरी केलय, मासे सुटी केलय, भाजलय, सार केलय. टाईम लागताच नाय ओ समदा करूक. तेतूर लायटीर धाड भरली ती वाटुचाव लागला." "तवाच सार भारी झाललो. मिक्सरार अशी चव येना नाय." "सगळा खरा पन माकाव इतकी कामा करुची सवय नाय ओ. तुमच्या भयनीक रजनीक वायच हातबॉट लावूक सांगलास तर बरा हो...

स्वागत

इमेज
 स्वागत वेणू मोबाईलवर भावाशी बोलत होती. ती आत पडवीत आली तशी सासूने विचारलं, "काय गो. वयनीची सुटका झाली? सिझर झाला काय नार्मल.. ता मरांदे , झिल झालो काय चेडू ता सांग." वेणूच्या वहिनीला पहिली मुलगी होती. आता मुलगाच होणर अशी सगळ्यांचीच आशा होती. वेणूने वहिनीला मुलगी झाली असं सांगताच तिची सासू नाराज झाली तरीही आपली नाराजी लपवत म्हणाली,"फुढच्या टायमाक बाळकृष्णाच येतलो बग तुझ्या वयनीच्या पोटी."  सासूच्या या आशीर्वादाबद्दल काय बोलावं तिचं तिला कळेना. या नवीन अंकुरासाठी दोन मायेचे शब्द सासूच्या तोंडून बाहेर पडेनात, स्वतः स्त्री असूनही स्त्रीजन्माविषयी एवढी अढी का , तिचं मन उद्विग्न झालं.  तिने आपल्या उभारल्या पोटावरनं हलकेच हात फिरवला. आत आकारत असललेल्या चिमुकल्या जीवाची चाहूल बोटांनी घेतली. 'कोन आसतला माझो बाळ..झिल काय चेडू? झिल झालो काय सासूबाय हत्तीवरना पेढेव वाटाक कमी येऊची नाय.' तिला खरंच दिसली सासू हत्तीवर अंबारीत बसून गावात फिरतेय नि गावकऱ्यांना पेढे वाटतेयसी. पण माका चेडू झाला तर..चेडवाचा स्वागत करीत काय ही काय दुसऱ्या टायमाक झिल होतलो म्हनान माका धीर देयत. ...

बयोआज्जी

इमेज
 बयोआज्जी ©®गीता गरुड. आजुबाजूला गर्द वनराई, त्यात वसलेलं टुमदार कौलारू घर. या घरात रहात होती, बयोआज्जी. बयोआज्जीची मुलगा नं मुलगी इथेच शिकून लहानाचे मोठे झाले होते. पंख फुटल्यावर पिल्लं कशी उडून जातात तसे मुलगी तिच्या सासरी व मुलगा दूर तिकडे औरगांबादला स्थायिक झाला होता. बयोआज्जीलाही न्हेलं होतनं तिकडे. बयोआज्जी तिची नातवंड दहाबारा वर्षाची होईस्तर तिथे होती. उन्हाळ्याच्या सुट्टीत सून नातवंडांना घेऊन माहेरी गेली की बयोआज्जी आपलं गाठोडं घेऊन मुळ मुक्कामी यायची.  अंगण, परसदार झाडून लख्ख करायची. बाजूच्या शुभाला आपल्याकडली मिठाई देऊन तिच्याकडनं तांब्यापितळेची भांडी लख्ख घासून घ्यायची. शुभाचा आमसूल, रखा नि नारळाची किशी धरलेला हात घसाघसा पातेल्यांवरनं,तपिलावरनं नि हंडे,कळशांवरनं फिरला की भांडी कशी नव्या नवरीसारखी चमकू लागत.  शुभा जेमतेम चौदाएक वर्षांची होती पण पोर कामाला हुशार. बाप दारुडा असल्याने घरी अठराविश्व दारिद्र्य होतं पण शुभाच्या अंगावरला परकरपोलका अगदी स्वच्छ धुतलेला असे. शुभाला स्वच्छतेची आवड होती. साबण नसला तर रिठा पाण्यात भिजत घालून त्या पाण्याने ती सुबकून सुबकून कप...

दिदूला कावळा शिवला!

इमेज
 दिदूला कावळा शिवला! ©® गीता गरुड. कुंदा इयत्ता आठवीतली मुलगी. सगळ्या विषयांत अगदी हुशार. शास्त्र विषय तर अगदी आवडीचा. सातवीची स्कॉलरशीपही मिळवली पठ्ठीने.  घाटपांडे बाई व मुख्याध्यापक सावंत सर स्वतः तिच्या घरी पुष्पगुच्छ व पेढे घेऊन गेले. घरात पाहुणेमंडळींची वर्दळ होती. हो, सण होता घरात.. गौरीगणपती विराजमान होते. किती रोषणाई केलेली! शिवाय आजुबाजूला रेती पसरुन त्यात मेथी पेरली होती. त्या मेथीचे कोवळे हिरवेगार रोप बाप्पाच्या सजावटीत भर घालत होते. बाप्पाच्या मागील बाजूस कमळाचे चित्र रेखाटले होते.  सर व बाईंनी हातपाय धुवून गणपतीला व गौराईला नमस्कार केला. कालच सत्यनारायणाची पूजा झाली होती. कुंदाच्या वडिलांनी दोघांनाही तीर्थप्रसाद दिला. सर बाई दोघंही स्थानापन्न झाले.  कुंदाच्या वडिलांनी कुंदाच्या आजीस, सरांची व बाईंची ओळख करुन दिली. घाटपांडे बाईंनी कुंदाचे कौतुक केले. "तुमची कुंदा म्हणजे कोहिनूर हिरा आहे हो. अगदी प्रांजळ,सालस,मनमिळावू विद्यार्थिनी..साऱ्या स्टाफची लाडकी. अक्षर तर मोत्याला लाजवेल असं. भाषण,न्रुत्य..सगळ्यात पुढे. शिष्यवृत्ती मिळवून आपल्या शाळेची पत वाढवली बेट...

सोयरीक

इमेज
 सोयरीक ©®गीता गरुड. बबन नि लताच्या लग्नाला नुकताच महिना होत आला होता. प्रेमाच्या गुलाबी वाटेवर ही दोन पाखरं उडत होती. बबनची आई सत्यवती तशी काटक होती. कामाला वाघ होती नि स्वभावाने खूप प्रेमळ होती. बबन्या तिचा लाडका झील आणि या लाडक्या झीलाची एकुलती एक बायको लता म्हणून लतावरही तिचा जीव होता.  सत्यवती, लतेला काही शिस्तीचं बोलली तरी लताला लागायचं मग लता मुसमुसायची. बबनला ती म्हणायची,"हयसर माझा जमुचा नाय. सासूबायंफुढे श्यानपन नाय." बबन्या म्हणायचा,"गो तुका काय खाताहा का काय माझी आव्स का ढास मारता?" लता म्हणायची,"तुमका नाय समजाचा ता. हिना उठ म्हतल्यान काय उठाचा नि बस म्हतल्यान काय बसाचा. मिया काय बाटलीतलो जीन आसय काय ही सांगात ती कामा करूक! नि आपले चेडवाक कशी चोबाळता. तिकाव वायच रीतीचे चार गोष्टी शिकवूचे तर नाय." "आता तायग्यान काय केला तुझा? गो कालेजात शिकताहा ता बीए करताहा. तेचो अभ्यास तेका करूक नुको!" "व्हय तर मोटे पदये घेतली. कांबरुनात मोबाईल घिऊन कायमाय टायपीत आसता. पळून गेली काय समाजतला." "गो गो ताँड दिल्यान हा देवान म्हनान कायव बरा...

मायेचे ऋण

इमेज
 मायेचं ऋण ©®गीता गरुड. अगला स्टेशन विठ्ठ्लवाडी..पुढील स्थानक विठ्ठलवाडी अशी डब्यात सूचना ऐकू आली नि कैवल्यने जीजीला  उतरायचंय म्हंटलं. जीजीने काळ्यापांढऱ्या  केसांवरनं रीतसर हात फिरवला. डोकीवरचा पदर उगीचच अधिकच आवरूनसावरून घेतला. तिची उभ्या सळ्यांवाली प्लास्टीकची पिशवी कैवल्यने आपल्या हातीत घेतली व उतरताना तिला अगदी आपल्या पुढे घेतलं.  हिरव्याकंच काकणांनी भरलेले गोंदीव हात, कपाळाला ठसठशीत लाल चिरी,  नाकात मोत्याची नथ, डोळ्यांवर चष्मा असुनही जीजीच्या डोळ्यांतील भांबावलेले, निस्पृह; निरागस भाव सहजच कळत होते. कैवल्यने तिचा हात घट्ट धरला. रेल्वेस्टेशनचा जीना उतरून रस्ता क्रॉस करून बाजारात आल्यावर तिला साडीच्या दुकानात घेऊन गेला. "हयसर कित्याक रे? "तुझ्यासाठी लुगडी घेवया दोन." "खेका व्हयी! हत ती बस झाली." "जीजी, मिया म्हनतय म्हनान घी." दुकानात गाद्यांवर पांढऱ्या बेडशीट अंथरल्या होत्या. त्यांवर कैवल्यने जीजीला बसवलं. दुकानदाराने बारीक नक्षीची सुती लुगडी आणून तिच्यासमोर ठेवली. हिरवा, लाल, पिवळा, जांभळा, मोरपंखी..नानाविध रंगांतली लुगडी पाहून जीजी सुखावली. नव...