पोस्ट्स

जून, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आईची शाळा

                             आईची शाळा          तिच्या उदरी अंकुर उगवला नाही, परंतु ती हताश          झाली नाही. तिच्या शाळेतल्या प्रत्येक मुलाला            तिने आपलं मुल मानलं.            आज तिच्या हस्ते त्या शाळेचं नवीन नामकरण             झालं. सर्व विदयार्थ्यांनी, पालकांनी मिळून            शाळेचं नाव ठेवलं होतं,'आईची शाळा'.

गोष्ट एका आजीची(अंतिम भाग)

इमेज
  गोष् ट एका आजीची(अंतिम भाग) रात्री साधारण दोन वाजले असतील. फोनची रिंग वाजली. नानीने मोबाईल कानाला लावला. तेरेदेसाई बोलत होते. "भाऊ, एवढ्या रात्री सगळं ठीक ना." "अं हो नाही. नंदिनी..नंदिनी माझी नंदू ओ..उचक्या येताहेत तिला. काय करु. मधुला उठवाल?" "भाऊ, आम्ही आहोत ना. आधी शांत व्हा बघू. मी मधुला घेऊन आलेच." नानीने मधुच्या दारावर थाप मारली. मधु डोळे चोळत बाहेर आला. "काय नानी. बरं वाटत नाहीए का?" "अरे मला काय नेहमीच धाड भरते की काय? समोरच्या भाऊंचा फोन होता. नंदिनीताईंना जास्त झालंय..आपण बघू जाऊन." "थांब नानी पैसे घेतो." "अरे राजा, घेतले आहेत मी. तू चल. " "कमुला उठवू?" "वेडा क काय तू  दोन जीवांची ती निजूदेत तिला. मी रियाला उठवून कमूदीवर लक्ष ठेव म्हणून सांगितलय. तू चल बघू. हा बघ परत फोन करताहेत ते." मधुने शर्ट घातला. लेंग्यावरच निघत होता. नानी म्हणाली पँट घाल. कुठे बाहेर जावं लागलं म्हणजे." मधुला पटलं. दोघं तेरेदेसाईंच्मा घरी गेली. दार उघडंच होतं. नानीने आत जाऊन पाहिलं. उचक्या,आचके...

गोष्ट एका आजीची (भाग दहावा)

इमेज
  गोष्ट एका आजीची (भाग दहावा) नानीने थोडा विचार केला, मग म्हणाली,"नको गं शरु. मी सडाफटिंग आहे तेच उत्तम आहे. कधीही उठते. देवळात जाते. भजनीमंडळात जाते." ---------------------------------------------------- "हो घरातल्या माणसांना नको आणि या बाहेरच्या वेडसर मुलीला बरं संसार थाटायला जागा देताय." शर्वरी फणकाऱ्याने बोलली. नानींचा तीळपापड झाला,"शर्वरी तोंड आवर. तू माझ्या घरात आहेस याचं भान ठेव. वेडी नाहीय कौमुदी. विपरित परिस्थितीमुळे मनावर परिणाम झाला होता तिच्या. आता अगदी खणखणीत बरी आहे ती. मी स्वतः तिच्या डॉक्टरांना भेटून आलेय. मधुलाही सोबत न्हेलं होतं. त्यांनीही बिनधास्त लग्न करा म्हणून सांगितलं . आपल्या समाजात हे असंच होतं मानसिक रुग्ण बरा झाला तरी त्याला वाईट वागणूक देतात मग तो अधिकच कोषात जातो. कमुच्या बाबतीत मी असं होऊ देणार नाही." "अगं नानी पण ती कमू लागते कोण तुझी. तू का तिच्यासाठी एवढी त्वेषाने भांडते आहेस?" निरंजन शरुची बाजू घेत म्हणाला. "निरंजन, कमू एक प्रातिनिधिक स्त्री आहे रे. अशा कितीक महिला लहानपणी आपल्या जवळच्या माणसांकड...

गोष्ट एका आजीची (भाग अकरावा)

इमेज
  गोष्ट एका आजीची (भाग अकरावा) #रिया आजी चक्कर येऊन पडली,तिच्या डोक्याला केवढी मोठी खोप पडली. मला क्षणभर काहीच सुचेना. किती ब्लिडिंग होत होतं.  मी मधु अंकलला हाक मारली. मधु अंकल धावतच आला..त्याच्यापाठोपाठ कौमुदी. हॉस्पिटलमध्ये माझे आई,बाबा,निरंजन काका,शर्वरी आंटी एकापाठोपाठ एक येत होते. बाबांनी माझ्याकडे पाहिलं ..का पाहून नं पाहिल्यासारखं केलं.  शर्वरी काकू मात्र माझ्याच बाजूला येऊन बसली. ."तब्येत बरी ना आणि तो जस्सी गं..कुठे असतो हल्ली..मला वाटलं तू माझं मूल वगैरे म्हणून धिंगाणा घालशील पण ऐकलीस बाई." तू नक्की आजीला पहायला आलेयस की माझी चौकशी करायला..तोंडात आलेला प्रश्न मी मागे लोटला. आई काहीच बोलत नव्हती. तिला शरम येत होती माझी बहुतेक. अगं पण, द्यायचा होतास नं मला पुरेसा वेळ. मी चुकत होते..वहावत होते तेव्हा का नाही थांबवलंस? आजीने थांबवलं तर हेटाळणी केलीस तिची. मलाही तेव्हा आजीच चूक वाटली. नाहीतरी आजीच्या अपरोक्ष तू ती किती सेलफिश,सेल्फसेनटर्ड आहे तेच ठसवण्याचा प्रयत्न करायचीस आमच्यावर. हळूहळू बाबाचं नि माझंही मत तुझ्या पारड्यात पडलं. रितेशला मात्र तुझा दोन आज्यांत तुलना...

गोष्ट एका आजीची (भाग नववा)

इमेज
  गोष्ट एका आजीची (भाग नववा) "बरं झालं आलात," नानी म्हणाली. "हुं," शर्वरीने घर न्याहाळत हुंकार दिला . कौमुदीला वरुन खाली न्याहाळत म्हणाली,"ही बरी ठेवलीत घरकामाला. लग्नपण करुन दिलात म्हणे ह्यांचं." "तुम्हाला कोणी सानगितलं?" "अहो, असल्या बातम्या लपून थोडीच रहातात. कौमुदी..तिचं वेडसर वागणं..मधुचं तिला पळवून न्हेणं..लग्न करणं..यात तुमचा पुढाकार..सारं कळलं आम्हाला." ------------------------------------------------ "मधु आणि कौमुदी मला माझ्या मुलांसारखीच प्रिय आहेत आणि हो पुरती बरी झालेय कमू आता. हवंतर डॉक्टरानचं सर्टिफिकेट बघू शकता."नानीने उफाळून आलेला राग आवरत म्हंटलं. "बरं बरं," शर्वरी कुत्सित हसत म्हणाली. "बऱं वाटलं तुम्हाला भेटून. माझी नातपण आता उंचीला लागली," नानी नातीला मांडीवर घेत म्हणाली. आता निवांत रहा दोन दिवस. अनायासे सुट्टी आहेच. मी तुमच्या आवडीचं करुन घालते तुम्हाला. मला तेवढंच समाधान." "निवांत कसलं रहायला सांगताय. बरीच टेंशन्स आहेत आम्हाला." शर्वरीने डोक्याला हा...

गोष्ट एका आजीची (भाग आठवा)

इमेज
  गोष्ट एका आजीची (भाग आठवा) लग्न पंधरवड्यावर आलं होतं. मधु ,कौमुदी व नानीला घेऊन खरेदीला जायचे बेत आखत होता.  एका सकाळी तेरेदेसाईंच्या घराजवळ एक गाडी येऊन थांबली. त्यातून तेरेदेसाईंचा मुलगा व सून उतरले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या दोघांना पाहुनही कौमुदी हायपर झाली नाही. लवकरच तिला तिचा हक्काचा जोडीदार जो मिळणार होता. ----------------------------------------------------------- तेरेदेसाईंनी नानीला चहाला बोलावलं. मुलाची,सुनेची ओळख करुन दिली. नानी मनमोकळं हसली पण त्या दोघांनाही नानीशी बोलावसं वाटत नव्हतं. नानीला का बोलावलं उगाच असा त्या उभयतांच्या चेहऱ्यावरचा प्रश्न,नाराजी नानी वाचू शकत होती. इतके वर्ष ती हाडाची शिक्षिका जे होती..कोण किती पाण्यात आहे, तिला पुरतं ओळखता येत होतं. ती मनात म्हणाली..असो, तेरेदेसाईंच्या मनाखातर आले. चारेक दिवसांत तेरेदेसाईच नानीच्या घरी आले. "तेरेदेसाई, आता कौमुदीच्या लग्नाची तयारी करायला घेऊ आपण. आयत्यावेळी गडबड नको. हॉल,भटजी..सगळं पाहिलं पाहिजे." नानी म्हणाली. "त्याबद्दलच बोलायचं होतं" "अहो, मग असे चाचरताय का? ब...

गोष्ट एका आजीची (भाग सातवा)

इमेज
  गोष्ट एका आजीची (भाग सातवा) रतीश, मी त्या डॉक्टरशी बोलून आलेय. त्या म्हणाल्यात..लग्नानंतर कमुच्या वागण्यात निश्चित फरक पडेल. थोडाशी रिसँक घ्यावीच लागते. त्यालाच तर आयुष्य म्हणतात." "तू कधी घेतली आहेस अशी रिस्क आयुष्यात?" ------------------------------------------------------ आजी हसली. अरे तुझा बाबा झाला तेंव्हा डॉक्टरांनी आशा सोडली होती. मुल जगणार नाही म्हणत होते. अतिशय कमी श्वासोच्छ्वास चालला होता बाळाचा. मी हट्टाने जवळ घेतलं त्याला. घट्ट छातीशी बिलगून धरलं. आंजारतगोंजारत राहिले..बाळाच्या तोंडून आवाज फुटला. डॉक्टरांनीही कौतुक केलं. माझी धाकटी बहीण बेबीआजी ठाऊकय नं तुला. तिला नाचाचं प्रशिक्षण घ्यायचं होतं. घरुन विरोध. मग मीच किडुकमिडुक कामं करुन पैसे गोळा केले. टायपिंगच्या नावाखाली बेबीला न्रुत्याच्या क्लासला धाडलं.  चांगल्यासाठी बोललेलं खोटं पचून जातं रे. वाईटासाठी बोललेलं खरंही पचत नाही. " "लक्षात ठेवेन आजी. येईन परत तुला भेटायला." नानीने भरल्या डोळ्यांनी नातवाला निरोप दिला. ---------------------------- दुसऱ्या दिवशी नानीला कौमुद...

गोष्ट एका आजीची(भाग सहावा)

इमेज
  गोष्ट एका आजीची(भाग सहावा) नानीच्या हातची ताकाची कढी,भात जेवून परीक्षा झाली की घरी ये, असं रतीशला सांगून प्रथमेश निघाला. लेक येऊन गेल्याने नानीलाही समाधान वाटलं. संध्याकाळी तेरेदेसाई आले. नानीने दार उघडलं. ते आत येऊन बसले. नानीने पाणी आणून दिलं. कोणीच बोलत नव्हतं पण ती शांतताही बोलकी होती. शेवटी तेरेदेसाईंनीच विषयाला हात घातला. ------------------------------------------------ "ही कमू मी भाची म्हणून सांगतो ती कौमुदी भाची नव्हे हो माझी. ती आमच्याकडे येणाऱ्या पोळीभाजीवालीची मुलगी. घरात एकटी कशी ठेवायची म्हणून कौमुदीला आमच्याकडे ठेवून ती जायची. नंदिनीचा कँसर डिटेक्ट झाला. आम्हा उभयतांच्या इस्पितळाच्या वाऱ्या वाढल्या. मुलगा कॉलेजला. कौमुदी एकटीच येऊन दुपारची आमच्या घरी अभ्यासाला बसायची..कधी टिव्ही बघायची. मध्यंतरी नाताळच्या सुट्ट्या सुरु होत्या. मुलाच्या अंगात सैतान शिरला आणि त्याने ह्या पोरीचा खेळण्यासारखा वापर केला. पोरही भुलली त्याच्या मायावी थापांना.  पोर एक शब्दाने कुणाला बोलली नाही.   त्याच दरम्यान त्याचं बाहेरही लफडं चालू होतं. आई एवढी आजारी असताना त्...

गोष्ट एका आजीची (भाग पाचवा)

इमेज
  गोष्ट एका आजीची (भाग पाचवा) "डाक्टरांना बोलवून आणू काय?" सखूने काळजीने विचारलं. "नको अगं. थोडं बीपी लो झालं वाटतं. तू लिंबूपाणी दिलंस नं त्याने बरं वाटलं बघ. कपडे वाळत घाल न् जा तू. नको काळजी करुस माझी. काही लागलंच तर फोन करेन तुला." "नक्की करा फोन , नानी. कधीव रातच्यालाबी बोलवलात तरीबी धावत इन." सखू चपला पायात सरकवत म्हणाली. नानीने मग रात्री साधीशी खिचडीच केली. मनावर शीण जो आला होता. --------------------------------------------------- दुसऱ्या दिवशी सकाळीच दाराची बेल वाजली. रतीश, नानीच्या थोरल्या मुलाचा मुलगा दारात उभा. नानीने त्याला आत घेतलं. "अरे पत्ता कसा कळला तुला? आधी कळवायचस तरी. मी मधुला पाठवलं असतं तुला आणायला." नानी पाणी आणून देत म्हणाली. रतीशने पाठीवरची स्याक उतरवली. शूज काढले नि म्हणाला,"मधुकाकांकडूनच एड्रेस मिळाला मला. सध्या घरी वातावरण बिघडलय न् माझी परीक्षा जवळ आलीय त्याचं कुणालाच काही देणंघेणं नाही. तुझ्या ओरड्याला हसायचो मी पण आजी तू बरोबर होतीस. आता कळतय. मी राहू शकतो न् तुझ्यासोबत थोडे दिवस?" ...

गोष्ट एका आजीची(भाग चौथा)

इमेज
  गोष्ट एका आजीची (भाग चौथा) फाटक लोटलं तसं कुर्र आवाज केला त्याने. आतून मोठमोठ्याने बोलण्याचा आवाज येत होता..चुकीच्या वेळी आलो का आपण? परत जाऊया का..असं नानीच्या मनात द्वंद्व सुरु झालं. बागेतल्या रातराणीचा मंद सुगंध तिच्या रंध्रांत भिनला..काय होईल ते बघू म्हणत तिने दाराची बेल वाजवली. ------------------------------------------- तेरेदेसाईंनी दार उघडलं. नानीची नजर दिवाणखान्यात भिरभिरली. वस्तू इतस्तत: फेकलेल्या दिसत होत्या, पिंजारलेले केस  खांजवत,भेसुर डोळ्यांनी एक तरुणी कोपऱ्यात बसली होती. चोवीसेक वर्षांची असावी. नानीकडेच बघत होती ती. कुठून दुर्बुद्धी सुचली नि इथे आले असं झालं नानीला. या मुलीबाबत तेरेदेसाई नानीला काहीच बोलले नव्हते. 'भाची रहाते सोबत एवढंच सांगितलं होतं पण ती ही अशी आहे वगैरे. ते तरी पहिल्या भेटीत असं कसं सांगतील म्हणा,'नानी मनात बोलत होती. "सॉरी हं. आज जरा मेस आहे. आमची कमु रागावलेय. आपण आत जाऊया..माझ्या मिसेसशी.. नंदिनीशी ओळख करुन देतो तुमची." तेरेदेसाई म्हणाले. घरभर हॉस्पिटलमध्ये येतो तसा वास येत होता ज्याने नानीचं डोकं गरगरु लागलं. ...