पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मायेचे ऋण

इमेज
  मायेचं ऋण ©®गीता गरुड. अगला स्टेशन विठ्ठ्लवाडी..पुढील स्थानक विठ्ठलवाडी अशी डब्यात सूचना ऐकू आली नि कैवल्यने जीजीला  उतरायचंय म्हंटलं. जीजीने काळ्यापांढऱ्या  केसांवरनं रीतसर हात फिरवला. डोकीवरचा पदर उगीचच अधिकच आवरूनसावरून घेतला. तिची उभ्या सळ्यांवाली प्लास्टीकची पिशवी कैवल्यने आपल्या हातीत घेतली व उतरताना तिला अगदी आपल्या पुढे घेतलं. हिरव्याकंच काकणांनी भरलेले गोंदीव हात, कपाळाला ठसठशीत लाल चिरी,  नाकात मोत्याची नथ, डोळ्यांवर चष्मा असुनही जीजीच्या डोळ्यांतील भांबावलेले, निस्पृह; निरागस भाव सहजच कळत होते. कैवल्यने तिचा हात घट्ट धरला. रेल्वेस्टेशनचा जीना उतरून रस्ता क्रॉस करून बाजारात आल्यावर तिला साडीच्या दुकानात घेऊन गेला. "हयसर कित्याक रे? "तुझ्यासाठी लुगडी घेवया दोन." "खेका व्हयी! हत ती बस झाली." "जीजी, मिया म्हनतय म्हनान घी." दुकानात गाद्यांवर पांढऱ्या बेडशीट अंथरल्या होत्या. त्यांवर कैवल्यने जीजीला बसवलं. दुकानदाराने बारीक नक्षीची सुती लुगडी आणून तिच्यासमोर ठेवली. हिरवा, लाल, पिवळा, जांभळा, मोरपंखी..नानाविध रंगांतली लुगडी पाहून जीजी सुख...

जावईबापू

इमेज
  जावईबापू ©®गीता गरुड. वैशाखात कुसुम व आशुतोषचं लग्न झालं होतं. आशुतोषसोबत ती घाटकोपरला रहायला आली होती. कुसुमला दिवाळीसणासाठी माहेरी घेऊन जायला तिचे अण्णा जायचे होते खरे पण कुसुमनेच फोन करून कळवलं,"अण्णांनु, हे दिवाळेक माका घराकडे येऊक जमाचा नाय." "तुझी आव्स लय आठव काढताहा तुझी." "तुमचा म्हनना बरोबर असा अण्णांनु पन हयसर सासूबाईचो संधिवात चाळावलो हा. हातीन तांबयोदेखूल उचलूक गावना नाय तेंका." "मग बाये काय सांगतलय मिया. सासयेची सेवा कर. सावकाश ये.  कवा येतलस ती तारीख सांग. रिजर्वेशन करुक गावात." "नको अण्णांनु, रिझर्वेशन नको. ह्यांका सुट्टी घेऊक लावतय नि जोड्यान येतव." "बरा तर मगे फोन ठिवतय. तुझी आव्स शेजाऱ्यांथय गेली हा गजाली करूक, इली काय सांगतय तिका." अण्णांनी फोन ठेवला. इतक्यात चेडू येणार नाही या विचाराने थोडे नाराज झाले आणि मग स्वतःच्याच मनाची समजूत घालत खळ्यात फेऱ्या मारू लागले. अण्णांना दोन मुलं. थोरला मुलगा दिपक, वर्ष झालं गोव्यात नोकरीला होता.  कुसुम दिपकपेक्षा दोन वर्षांनी लहान पण मुलीची जात म्हणून नि नेटकं स...

अलक

इमेज
  इटुकल्या गोष्टी ©®गीता गरुड. १.भूक तो न चुकता दरवर्षी वारीला जायचा,सगळयांना तो विठ्ठलाचा परम भक्त वाटायचा, होता ही तो पण परम दरिद्री. आषाढीला पंढरपूरला विठ्ठलाजवळ जाऊन तो त्याला मनातलं सांगायचा, "विठुराया..तुझ्यावर भक्ती आहे खूप.. पण पोटाची भूक...मग काही दिवस का होईना सोय होऊन जाते रे वारी मध्ये या पोटाची.. हा माझा स्वार्थ ही  असतो रे तुला भेटण्यामागे ...समजून घेशील  ना पामराला.." २.काकू ती कोपऱ्यावरच्या भाजीवालीकडे गेली .  आज भाजीवालीचा नवरा बसला होता.  तिने भाजीवाल्या बेबीच्या तब्येतीची चौकशी वगैरे केली व अर्धा किलो वांगी,अर्धा किलो फ्लॉवर, मिरचीकोथिंबीर,गाजर,काकडी,शेवग्याच्या शेंगा एवढी भाजी निवडून त्याला वजन करण्यास स़ागितलं. एकशेचाळीस रुपये झाले काकू एकशेवीसच द्या काssकू असं त्या भाजीवाल्याने म्हणताच तिने रागीट कटाक्ष त्याच्यावर टाकला व भाजी न घेताच तिथून चालू पडली. ३.अंग रीक्षात दोन बाजुला दोन बाया नं मधे तो बसला होता, अगदी पाय फाकवून.  जरासुद्धा अंग आकसून बसावसं वाटत नव्हतं त्याला.  त्या दोन्ही कडांना बसलेल्या कसाबसा जीव चोरून त्याची ती घसट सह...

पाठचं भावंड

इमेज
  पाठचं भावंड ©®गीता गरुड. दिवाळी झाली तशी पाचसहा दिवस अजून सुट्टी असल्याने सासूबाईंनीच पल्लूला आईकडे तळकोकणात जाऊन ये म्हणून सुचवलं. "आम्ही दोघं करू दोन वेळचं आमच्या पुरतं जेवण, खालच्या पोळीभाजी केंद्रातून पोळ्या घेऊन येऊ,श फिरून येताना, पण तू जाऊन ये चार दिवस. माहेरसूख उपभोगून ये बाई." सासूचं असं समजुतीचं बोलणं ऐकून पल्लूनेही जायचं नक्की केलं. नेहमीची ऑफीसची कटकट, लेकीच्या शाळेतला तिला न पेलवलणारा अभ्यास, मोठाले प्रोजेक्ट्स जे आयांनीच करायचे म्हणून की काय दिले जातात या सगळ्या धबडग्यात सासूच्या समजुतीच्या शब्दांची शाल तिच्या अंगाखांद्यावर रुळायची, ऊब द्यायची. तेवढं एक सुख होतं खरं. पल्लू लेकीला रेशमला घेऊन गाडीत बसली. रेशम नाव खरंतर शाळेपुरतं. इकडची आज्जी तिला गोदाबाई म्हणायची. गोदाबाई म्हणजे इकडच्या आज्जीची सासू जी फार कडक होती. आपलं तेच खरं करायची. चार वर्षाच्या रेशमचा कारभारही तसाच होता म्हणून लाडाने आज्जी म्हणायची,"जीवंत असताना गोदाबाईंनी सासूरवास केला तो कमी की काय म्हणून नातीच्या रुपात पुन्हा प्रकटल्यात. हात धुवून मागे लागल्यात जणू..रामा रामा परमेश्वरा..असं बोल...

ए पिस ऑफ वेलवेट

इमेज
  ए पिस ऑफ वेलवेट..सो रोमँटिक😍 ©®गीता गरुड. प्लेटफॉर्म/फलाट क्रमांक तीन. सखी फलाटावर पोहचलेय. आपल्या खास मैत्रिणीची प्रितीची वाट पहात आहे. प्रिती जिन्यावरनं झपझप पावलं उचलत फलाटावर आली. तिच्या नजरेने सखीला शोधलं व पावलं सखीकडे वळली. सखी:  अगं प्रिती रोज टिकली लावणारी तू, आज टिकली लावली नाहीस ते गोल खूण दिसतेय बघ कपाळावर. अगदी टिकलीने शिक्कामोर्तब केलय तुझ्या भाळावर. प्रिती(कपाळाला बोट लावत): ही टिकलीपण ना टिकेल कपाळावर तर शपथ. बाकी कुठेही चिकटून बसण्यात हुशार ही बया. सखी: कोण बया? प्रिती: अगं टिकली गं. काल किनई यांचे चार मित्र आले होते आमच्याकडे. रविवार, सुट्टीचा दिवस.. हे दुपारी ताणून झोपले होते. मी यांच्या मित्रांना सरबत वगैरे दिलं, फराळही दिला बरं का नि यांना मिसकॉल दिले दोनतीन. हे डोळे चोळत आले घुश्श्यात मला ओरडायला. समोर मित्रांना पाहून लगेच एक्सप्रेशन्स चेंज. अगदी गालावरची खळी दाखवत गुड आफ्टरनून वगैरे. मित्र सुसाट हसत सुटले. दोघे तर लोळत होते फरशीवर. मी अचंबित. यांच्याकडे पाहिलं नि हास्यकारंज्याचं कारण उमजलं. माझी टिकली यांच्या खळीत अशी रुतून बसलेली. माझं बोट कपाळाकडे. ...