पोस्ट्स

मे, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वैशाखराणी

इमेज
  वैशाखराणी ©®गीता गरुड. नेसली आकाशी जरतारी दिमाखात वैशाखराणी आकाशी रंगावर खुले गुलाबी शाल्मलीची खडी वैशाखराणीच्या स्वागता पायघडी सोनमोहराची ल्याली कंठीहार कण्हेरीचा आणिक पैजणे सुरंगीकळ्यांची कानी बहाव्याचे डूल नाकात पलाशाची नथ देवचाफ्याचे हो बाजूबंद केसांत सुवासिक अनंत सोनसळी पदर अंगावर फुललाय ताम्हण डोळ्यांत अमलताश नि गुलमोहर भाळी हळदीकुंकूम रेखीव रेशीमपाऊले उमटवीत आली निसर्गराजाची साजिरी लेक

ग्रीष्मफुलोरा

इमेज
  ग्रीष्मफुलोरा ©®गीता गरुड. ताम्हणपुष्पांचे जांभुळके झुबके नील नभावर कशिदाकारी जसे उन्हांत पहावी गुलमोहराची लालिमा हिरव्याकंच पंखांत लालबुंद पिसारा गुलाबी शाल्मली फेडते लोचनपारणे लोभसवाणे रुपडे वेड्या मना भुलवे ठाऊकै स्रुष्टीला दोनाचे होतात चार तरुणाईसाठी बहावातोरणांचा साज माहेराच्या परसवात फुलते अबोली गजरा कराया येती त्वरेने लेकीबाळी घामाचा कामाचा शिणवटा करी दूर शुभ्रधवलसे इवलाले मोगऱ्याचे फुल मखमली पलाश हाकारितो पाखरांना अस्मानात पेटलेला हा अंगार भगवा कुठे फुले सोनमोहर कुठे फुले चाफा निसर्गाची रंगपंचमी पहा रे मानसा

अजब नातं

इमेज
  अजब नातं ©®गीता गरुड. तनुने मनापासून प्रेम केलं अवीवर. अविनाश राजे..तिचा शाळेपासूनचा मित्र. कॉलेजातही दोघं सोबत. कॉलेजात त्यांची जोडी फेमस होती. अवी पुढे शिकण्यासाठी परदेशात गेला. जाताना तनुला सांगून गेला,"माझं शिक्षण पुर्ण होताच मी भारतात येईन. मग आपण लग्न करु." "बघ हं. नाहीतर मी तुझी वाट बघता बघता म्हातारी होईन नि तू तिथं बिर्हाड थाटशील."   "हेच ओळखलंस मला. तुला तसं वाटतं तर मी नाही जात  परदेशात." "कसला चिडतोस रे. तू पण ना. चेष्टा केली मी तुझी." "तनू,नको अशी चेष्टा करुस. जिव्हारी लागते बघ," असं म्हणत अवीने तनुला जवळ घेतलं. तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले. दोघंजणं अस्ताला जाणारा सुर्य बघत बसली. दोघांचेही कंठ दाटून आले होते. काही वर्षांपूर्वी एकामेकाला न ओळखणारे दोन जीव,एकमेकांत निर्भेळपणे गुंतून गेले होते..अलवार गुंता..भावनांचा..दोघांचेही पापणकाठ ओलावणारा." दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला. तनु त्या दिवशी रात्री झोपू शकली नव्हती. अवी तिच्यापासून दूर जाणार ही जाणीव तिला झोपू देत नव्हती. तनूने मम्मीपप्पांना अवीबद्दल काहीच सांगितलं नव्ह...