तर्हेवाईक माणसे
तर्हेवाईक माणसं ©®गीता गरुड. काही वर्षांपूर्वी, आमच्या पोस्ट ऑफिसच्या काऊंटरला एक गोऱ्यापान बाई बसायच्या. त्या काऊंटरला रजिस्टर, मनि ऑर्डर अशी दोनतीन कामांची लाईन लागलेली असायची, बाहेर माणसं ताटकळत उभी. लायनीतल्या माणसांना आत काय चाललय ते पहाण्याची कोण उत्कंठा, उत्सुकता असते. असेच एकदोघे खिडकीतनं आत बघत असता, बाई जोरात ओरडल्या, रा़ग कडेला सरकवा, माझ्यासमोर नको, माझं थोबाड बघू नका. माझं थोबाड बघायला घरात माझा नवरा आहे. बाहेरच्या ग्राहकांची थोबाडे खाडकन उतरली, अगदी पहाण्यासारखी झाली. उपमर्द कसा करावा ते ह्या काऊंटरच्या आत असणाऱ्यांकडून शिकावं. यावरून आठवलं, एकदा दाढ लयच ठणकत होती, काय तो सोक्षमोक्ष लावायचा..दाढेचा म्हणून डेंटिस्टकडे गेले. डेंटिस्ट सत्तरीकडे झुकलेले. त्यांचं आत एका पेशंटला तपासणं चालू होतं. सिमेंट, खडीबिडी भरत होते असतील दातात, घ्रु घ्रु मशीनचा आवाजही येत होता. तो आवाज वगैरे बंद झाला तशा माझ्यासमोर बसलेल्या बाई ज्या अंबरनाथवरून ट्रेनने आल्या होत्या त्या पुढचा नंबर त्यांचा असल्या कारणाने दारजवळ उभ्या राहिल्या नि अजून एकदोघे तिथे काही कामासाठी उभे राहिले. डॉक्...