नातसून
नातसून <script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-7389619452372445" crossorigin="anonymous"></script> ©®गीता गरुड. "ए मयंक, तुझ्या आजोळी मला दिवसभर साडीत रहावं लागणार का रे?" "कोणी सांगितलं तुला? असं काहीही नसतं गं.पंजाबी ड्रेस, ट्रेकसुट..तुला ज्यात सुटसुटीत वाटेल ते घाल. देवळात जाताना मात्र साडी नेस." "बरं. ए पण आपण कुठेतरी ट्रीपला गेलो असतो की. तिथुनच गोवा जवळ आहे ना. गोव्याला तरी जाऊ दोन दिवस." "बरं. बघू.आधी पोहोचू तरी वेंगुर्ल्यात. पुढचं पुढे." "मग थोडंच ऐकणार तू माझं, तिथे गेलं की. आधी प्रॉमिस दे गोवा ट्रीपचं तरच जाऊ आपण तुझ्या आजोळी." ज्योत्स्ना हट्टाने म्हणाली. "बरं बाई देतो प्रॉमिस. गोवाच काय, तिथून पुढं केरळातही जाऊ." "नको उगा हवेत बाण उडवूस.आणि काय रे तिथे अहोजाहो करावं लागेल का तुला?" यावर मात्र मयंक हसू लागला. "तुला काय जातय हसायला. तुम्हा पोरांचं बरं असतं. सासरमाहेर वगैरे नसतं. आम्हा मुलींनाच सगळीकड...