पुस्तक समिक्षा 'ब्र'
#ब्र कविता महाजन राजहंस प्रकाशन, पुणे तोंडातनं ब्र काढायची हिंमत नव्हती..अशा प्रकारची वाक्य आपण ऐकत आलो, उच्चारत आलो पण हा ब्र म्हणजे नेमकं काय तर स्वत:चं म्हणणं मांडण्याची हिंमत. कथेतील नायिका प्रफुल्ला हिचं व्यक्तीगत जीवन व तिचं सामाजिक जीवन या दोन समांतर रस्त्यांवरनं कादंबरी वेग घेते. प्रफुल्लाला दोन बहिणी व एक भाऊ. मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं. प्रफुल्ला एका कंपनीत टायपिस्ट म्हणून काम करते, तिथले साहेब तिला मागणी घालतात नि प्रफुल्लाचं त्यांच्याशी लग्न होतं. पुढे तिला बिट्टू होतो. ती नवऱ्याला घरीही साहेबच म्हणते हा साहेबरुपी, नवरारुपी पुरुष तिला नेहमी शिव्यांची लाखोली वहातो, लाथाखोटांनी मारतो इतकंच काय तर मुलाच्या मनावरही तुझी आई अडाणी, बावळट, व्यवहारशून्य आहे असं बिंबवत रहातो. हा साहेब दुसरीशी सूत जुळवतो. ओढूनताणून संबंध टिकवण्यापेक्षा प्रफुल्ला त्याला सोडचिठ्ठी देते. मुलगाही वडिलांसोबत निघून जातो. माहेरून भावाचा अजिबात पाठिंबा नाही, उलट आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा उपदेश. प्रफुल्ला मित्राच्या सामाजिक संस्थेत सर्व्हे करून अहवाल लिहिण्याचं काम स्वीकारते, कितीक गाव...