नातवाची माया
नातवाची माया ©®गीता गरुड. गावात थंडी वाढू लागली. पहाटे तर कौलातसून थंडी आली. त्यामुळे बाबूला जोराची शू लागली. बाबू बाहेर आला. खळ्याच्या पेळेवरून थोडा पुढे गेला नी जासनीला पाणी घालत होता तर त्याला फटाके उडवल्याचा आवाज ऐकू आला. तिथे फडतरीवर बाबूची आई तंबाखूची काळी मशेरी दातांवर चोळीत बसली होती. चुळ भरायला तांब्यात पानी घेतलं होतं. बाबू आयेजवळ गेला. "गे आये दिवाळी सोपली ना." "होय तर देवदिवाळीव झाली." " मग गे फटाके कसे वाजतहत?" "अरे तो तुझो मित्र असा ना सचलो नह्यजवळचो..तेची आजी वारली." "कशान गे आये?" "म्हातारा मानूस. थंडी लागली आसतली. हातपाय धरतत. लाकडासारे हुतत मगे गचाकतत." बाबू हात धुवून त्याच्या आजीच्या खोलीत गेला. आजी 'आये गे' करीत होती. "आजी ए आजी" "काय रे माज्या वासरा?" "तुका बरा नाय वाटत हा काय?" "अरे लेकरा, हे थंडीन आंगमास निसता फुटताहा. हातापायान वडी येतहत." "आजी तुझा बुरनूस फाटलाहा. तेतुरसून थंडी आत घुसत असतली." "होय रे. झाली मोप वरसा ते बुरनुसाक. तुझ...