पोस्ट्स

ऑगस्ट, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नजरेने माप

इमेज
नजरेने माप मला कुणी सांगितलंं मोदकाच्या साहित्यकृतीची मापं द्या तर एक वाटी तांदूळपिठी, एक वाटी पाणी, अर्ध्या नारळाचा चव, पाव वाटी गुळ किंवा थोडा जास्त, कुटलेली वेलचीची चारेक बोंड. हे असं लिहिणं नि वाचणं म्हणजे थिअरी झालं. थिअरॉटीकल पार्ट कितीही मुखोद्गत केला तरी practice makes a man perfect या इंग्रजी उक्तीनुसार मोदक तेही उकडीचे करायचे तर ते आई, आजीच्या हातचे निरीक्षणातून शिकावे.  आमच्याकडे दर संकष्टी चतुर्थीला मोदक व्हायचे. आई पिठाची उकड घेऊन बसली की मी तिच्यासोबत बसायचे. आईसारख्या मला कळ्या पाडता यायच्या नैत मग आई सांगे, "मलाही लहान असताना कळ्या पाडणं जमत नव्हतं. मी अगदी लहानपणापासनं उपवास केले. चतुर्थीला चुल सारवून नंतर मोदक करायला बसायचे. कळ्या येत नव्हत्या म्हणून मग चार पाकळीचा मोदक करायचे." हे असं सांगता सांगता आईच्या तळहातावर चार पाकळ्यांचा मोदक तयार झालेला असे. अगदी पारिजातकाचं फुल जणू, मग मीही तसाच करू लागले.  दर संकष्टीला माझी बोटं <script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-7389619452372445"      ...

जुनी झाडा

इमेज
  #जुनी_झाडा ©® गीता गरुड. शेरलेकारीन,चव्हानीन नी हेळेकारीन दोपारी जेवुनखाऊन झाल्यार गजालीक बसतत. शेरलेकारीन : आज बाय वायच दह्य हुता तेची ताकाची कढी केलय.नी कारलेचे भेसी करुन भाजलय.सदीची कसली भाजी करुची? चव्हानीन: मिया आज पिठी केललय गे नी तोंडाक चुरनाची कापा. हेळेकारीन: कायव करा तडे.वायच वाटीभर माका तिनसाना हाडून देवा.ते सुनेन कसलो पालक पनीर केलोहो.शेवळासारा दिसता नी भुतुर कसले नासक्या दुधाचे पांढरे फोडी.तेंनी ता आवडीन खाला.मिया याक ढोमा भाजलय नी चटणीवांगडा भात खालय.तेंचा ता पनील खाऊन पोटात ढवाळला बिवाळला तर आता सणव जवळ इलो हा.ओगीच सगळ्यांची धावपळ होईत. शेरलेकारीन: गे आज आवारना.आताशी सगळ्यांची कोब्याची,लादीची घरा.पयले दिस आठवतत गे.आवारण्यादिशी मासे रांदायचाव.मगे जेवान झाल्यार भांडाकुंडा करुन, पुरा घर शेणान सारवायचाव..भायरली पडवी,वळय,होवर्या,माजघर,माजघरातला चुलीचा पाटान,पाटलाहार....नी मगे शँण वायच सुकत इला काय करटेत पांढरो चुनो कालवून ते ओले जमनीर बोटांनी काढलली ती चकरा..सगळा आठावता गे बाय..ह्या सिमेंटच्या घरानी ती मजा रवली नाय. हेळेकारीन: होय तर,आता ता रंगीत मोठाचा मोठा छत ह...

मोदक चारोळ्या आपल्या मालवणीत

इमेज
 मोदक चारोळ्या आपल्या मालवणीत ●मोदक आवशीचे काय बायलेचे बरे बाबल्याक प्रश्न इचारलो कुल्याक पाय लावान बाबलो भायरल्या भायर पळालो ● मोदक तळणीचे काय उकडीचे कोकणस्थदेशस्थांचो वाद रंगलो माझ्या पोटात दोनव मावतीत श्रद्धेन देवा गणोबा म्हनलो ●बासमतीचा पीठ उकडून मोदक केलय वरीसभर पन बेळ्याच्या पीठाची चव नाय तेंका नखुटभर   ●सुनेन मोदक केल्यान सासयेन ठीक म्हटल्यान नातीन मोदक केल्यान इल्यागेल्याक देखवल्यान ●साच्यातले मोदक येकसारे येतत मुंबयसून इलला पपी बोलला  हातीन वळलल्या कळ्याच सुरेख गमतत, तेकाच समाजला ●कितीव करा मोदक अकरा नायतर एकवीस जोडीक न्हेवरी व्हयीच ही मालवण्यांची रीत ●मोदक उकडता उकडता वास सुटलो घमघमावून पाना आमच्या हारली मा आरडत इली राण्यांची सून ●नवऱ्याच्या पानात जेवूक नयी व्हकाल बसली उष्टावललो मोदक बघान गालार लाली चढली --सौ.गीता गजानन गरुड.

माळ्यावरचं भूत

इमेज
  माळ्यावरचं भूत ©® गीता गरुड. थोडसं नाकात बोलायचा म्हणून त्याचं नाव गेंगाण्या पडलं. गेंगाण्याला बायकोही  अगदी चारचौघात उठून दिसणारी मिळाली होती. आजुबाजूच्या शेजारी मित्रांना, गेंगाण्याला लाभलेलं हे दुर्मिळ स्त्रीरत्न पाहून गेंगाण्याची ईर्षा वाटे. इतक्या साध्याभोळ्या माणसाला कशी काय अशी रुपवती लाभली असे विचार शेजाऱ्यांच्या मनात येत . या विषयावर रात्रभर मित्रांच्या ओल्या पार्टीसोबत चर्चा रंगत. गेंगाण्याचं मात्र दुरून डोंगर साजरे असं झालंं होतं. बायको दिसायला रुपवान होतीच पण तितकीच खाष्ट होती. पहिली दोनेक वर्ष मवाळ वागली पण दोन मुलं होताच तिचा प्रेमळपणा लोप पावू लागला. दिवसेंदिवस ती अधिकाधिक हिंसक बनत होती. आधीचाच श्यामळू गेंगाण्या बायकोच्या तापट स्वभावाने अगदीच मलूल झाला. बायको सांगेल ती कामे तो करत होता, अगदी मुकाट करायचा. रेशनच्या लायनीत उभं रहाणे, बाजारहाट करणे इतकंच काय घरातली लादी पुसणे, बायकोची कंबर धरली असताना कपडे धुणे, भांडी घासणे, तिच्या कंबरेला रगडून देणे किती नि काय काय करायचा तरी बायको त्याला या ना त्या कारणाने फुलं वहायचीच. गेंगाण्याची बायको दरवर्षी श्रावण प...

तुझ्याविना मी अधुरा!

इमेज
  तुझ्याविना मी अधुरा! "पल्लवी माझा रुमाल कुठेय? माझे सॉक्स?  एक काम धड करत नाहीस. नुसती मेंगळटासारखी रहातेस. बाकीच्या बायका बघ कशा झटपट कामं आवरतात, टिपटॉप रहातात.. गाडीसाठी धावतात." प्रशांतची नॉनस्टॉप बडबड चालू होती.   पल्लवीने  प्रशांतला रुमाल, डबा.. सगळं आणून दिलं. आज तिच्या लेकाच्या.. कैवल्यच्या शाळेत फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होती. परिसरातल्या झाडांची पानं आणून तिने कैवल्यसाठी आदिमानवाचा ड्रेस शिवला होता.  सकाळी त्या तयारीत प्रशांतला सगळं हातात देण्यास पल्लवीला अमंळ उशीरच झाला. प्रशांतने नेहमीप्रमाणे तिच्यावर तोंडसुख घेतलं. ------------ पल्लवीने कैवल्यला उठवलं. त्याला अंघोळ घातली. जम्माडी जंमत सांगत भाजीपोळीचा रोल भरवला. मग त्याला आदिमानवाची वल्कलं घातली. कैवल्यला मम्माने शिवलेला हिरव्यागार पानांचा ड्रेस खूपच आवडला. त्याने डोळे मोठे करत,बोटांचा मोर नाचवून दाखवला तसा पल्लूने लेकाचा गालगुच्चा घेतला. "हे गं काय मम्मुडी. मोठा झालोय नं मी. मोठ्या माणसांची पापी घ्यायची नसते. बघ नीट बघ. मिशीपण आलेय मला. दिसली तुला?" "अय्या हो की. मी पाहिलंच नव्हतं." पल्लू भोळ...

दोन वेण्या

#दोन_वेण्या ©® गीता गरुड. लहानपणी पाचवी सहावीपर्यंत माझे केस आईने लहान ठेवलेले.आम्ही उन्हाळ्यात गावी जायचो.तेंव्हा परसवात भरपूर आबोली फुललेली असे. मी खोलगट ताट घेऊन जायचे व फुललेली आबोली काढायचे.ताट फुलांनी अगदी भरुन जाई.या फुलांना विशेष असा गंध नसतो पण त्यांचा मोहक आबोली रंग व पिवळसर देठ मनाला भावतो. तिथेच पायर्यांवर ते ताट घेऊन मी बसायचे.आई किंवा आजी सुईदोरा आणून द्यायच्या.सुईत दोरा गुंतून मी आबोलीची फुले चक्राकार गुंतायला सुरुवात करायचे(अधिकच्या चिन्हात).ही फुले गुंफताना तोंड उघडे असायचे,एवढी मी त्यात तल्लीन व्हायचे.हातभर लांब अबोलीचा गजरा तयार होई.कोकणात याला वळेसर असे म्हणतात. माझे केस लहान होते असल्याकारणाने आई माझ्या हेअरबँडला गजरा बांधे.सगळ्या काक्या त्यातला थोडा थोडा गजरा काढून घेत व माळत. आठवड्याच्या बाजारात तर बाया असे वळेसर आणून विकायला बसीत. मग शाळेत बाईंनी बो बांधुन यायचा नियम काढला.तेंव्हापासून आईने माझे केस कापायचे बंद केले. त्यानंतर लहान खांद्यापर्यंतच्या वेण्या.. त्या पुढे मोठ्या होत जाऊन दुरेघी वहीसारख्या दुहेरी वेण्या झाल्या.मी शाळेत जाण्यापुर्वीआई माझ्या केसांना खो...

चटपटीत मालवणी उखाणे

इमेज
 चटपटीत, लज्लजतदार मालवणी उखाणे ©® गीता गरुड. १. रातांब्याच्या झाडावर लालेलाल हुमले रावांका आवाडतत चायतसून चिरमुले २. कोकणातला खाजा खुसखुशीत लागता राव नि माझा पिठीभातार भागता ३. पाठल्याहारचो आंबो साखरेसारो गोड रावांनी हाडल्यानी मऊ गादी नि लोड ४. थोरले काजीच्या झाडार चानी बघा नाचता रावांच्या डोळ्यात पीरतीचा चान्ना लकाकता ५. चाराबोरा फोडुची मजाच येगळी रावांचा आजवळ बावबांबुळी ६. कापात कापा नीरफणसाची कापा ..चा नाव घितय लक्ष देऊन आयका. ७. हिरीतला पानी जसा कावळ्याचो डोळो ..राव माजो असा लयच भोळो ८. लगीन लागला..बेंडबाजो वाजलो ..राव माज्या आयुक्साचो धनी झालो. ९. करवली करवली म्हनान हालात बोवाळली ....रावांची नदार तिच्यारच खिळली १०. सासरे आसत प्रेमळ, सासूबाय खमकी        ..रावांनी हाडल्यानी नाकातली चमकी ११. अभ्यासात होतय तसा वायच मठ्ठ        ..रावांवांगडा लगीन होताच झालय लठ्ठ १२. तुळशीच्या पेळेर बसली पोराटोरा        ..राव म्हनतत गो भुतूर चल की जरा १३. रातीचा लखलखीत चान्ना पडता ...

बायकोचे आईवडील

इमेज
  बायकोचे आईवडील ©® गीता गरुड. तात्या सेवानिवृत्त झाले. आता रोजसारखं सकाळी उठून ट्रेन पकडण्यासाठी धावायला नको म्हणून त्यांचा जीव सुखावला. लेकाचं लग्न झालं होतं. तो शहरात वास्तव्यास होता. तात्यांनी जॉगिंग सुट,शूज असं सगळं सामान खरेदी केलं व पहाटे उठून जॉगिंगला जाऊ लागले. पहिल्याच दिवशी बाजूच्या बिल्डींगमधे बसलेल्या कुत्र्याने त्यांच्या पेहरावावरुन त्यांच्यावर डाउट घेतला व जोरजोरात भुंकत त्यांच्या पाठीच लागला. तात्या जाम घाबरले. तसे लहानपणापासून कुत्र्यांची थोडी भीतीच होती त्यांच्या मनात. सगळा जीव गोळा करुन ते वेगाने धावत सुटले. तरीही त्या कुत्र्याने त्यांना गाठलंच व जबड्यातले सगळे दात दाखवत त्यांच्यावर भुंकू लागला. तात्यांच्या पँटीच्या खिशातून लाल पिशवी लोंबत होती जी तात्यांची सहचारिणी इंदुमती हिने त्यांना जाताहेत तर बागेतल्या जास्वंदीच्या,अनंताच्या फांद्यांवरील चार फुलं आणण्यासाठी दिली होती. तात्यांचं नशीब बलवत्तर म्हणून त्या बिल्डींगचा वॉचमन,हिरालाल जो समोरच्या चहाच्या टपरीवर चहाचे घोट घेत घसा शेकवत बसला होता तो तात्यांची दयनीय स्थिती पाहून धावत आला . त्याने त्या कुत्र्याला हाकललं...