पोस्ट्स

सप्टेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सुलीची गौराई

इमेज
  सुलीची गौराई ©® गीता गरुड सुलेखा व सुयोगचं लग्न झालं,सत्यनारायणाची पूजा झाली. मांडवपरतणी झाली. दोघंजणं ठरल्याप्रमाणे हनिमुनला जाऊन आले. नवी सून संसारात रुळू लागली.  शहरात असुनही मोठा वाडा होता त्यांचा. तिचे सासरे श्री. अभिजीत इनामदार हे सुविख्यात वकील होते. सासू ग्रुहिणी होती. वाड्याच्या सभोवताली मेंदीचं कुंपण होतं. बागेत क्रुष्णकमळीचा वेल होता. लालपिवळ्या फुलांची  कर्दळी होती.सासरेबुवा सकाळी स्वतः बागकाम करायचे.    पपईच्या झाडाला पिवळ्याधम्मक पपई लगडल्या होत्या. आवळा,पेरु,चिकू,आंबा..सगळी झाडं लावली होती सासऱ्यांनी. एक कपभर कडक चहा दिला की खूष व्हायचे ते. सुलेखाही त्यांना झाडांविषयी बरेच प्रश्न विचारायची व तेही तितक्याच जिज्ञासेने त्यांची उत्तरं द्यायचे.  सुलेखाच्या सासुबाईंचा जास्त तो वेळ स्वैंपाकघरातच जायचा व त्यांना आवडायचंही चवीढवीचं करुन वाढायला. मोदक तर इतके सुबक,कळीदार वळायच्या की पहातच रहावेत. मऊसूत पुरणपोळी,मसालेभात सारं काही आवडीनं करायच्या. सुलेखाही त्यांच्या हाताखाली शिकत होती.     इतक्या सुखाने ओतप्रोत भरलेल्या घरातही सुलेखाला ...