हरवलेला भाऊराया गवसला
#हरवलेला_भाऊराया_गव सला रमा व माधव यांना दोन मुलं.मोठा सोहम.त्याच्यापाठीवर दोन वर्षांनी सई.सोहम व सईची भांडाभांडी किती असायची!आई वैतागायची त्यांची भांडणं सोडवून.अगदी लाडूत सुद्धा तुला मोठा,मला लहान मिळाला करुन भांडायची.फुटपट्टी घेऊन चॉकलेट माजून वाटे करायची. घरात नुसता धुमाकूळ, उशांनी मारामारी,हात,पाय,दात,नखं सगळी अस्त्र वापरायचे.एवढं होऊन आईचा मारही एकत्र खायचे.मग तंगडीत तंगडी घालून झोपून जात सोहम सईला गणितं शिकवे.शाळेत दोघं एकमेकांच बोट धरून जायची.सोहम मधल्यासुट्टीत फेरी मारुन सईचा हालहवाल बघून जायचा.कोणी सईची कळ काढलीच तर सोहम व त्याचे मित्र त्याची पळता भुई थोडी करीत. काळ पुढेपुढे सरकत गेला तसतसे सोहम व सईही मोठे झाले.सोहमने वाणिज्य शाखा निवडली तर सईने आर्ट्सला प्रवेश घेतला.यथावकाश सोहमचं लग्न त्याच्यासोबत शिकत असणाऱ्या मोहिनीशी झालं. मंदीमुळे सोहमला हवी तशी नोकरी मिळत नव्हती.तुटपुंज्या पगारामुळे तो नाराज असायचा.त्यातच त्याला लवकरात लवकर श्रीमंत व्हावसं वाटू लागतं. सई एका महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून नुकतीच लागली होती.आईबाबा तिच्या लग्नाचं बघत होते.सोहमने सईला मस्का ...