लिव्ह इन
लिव्ह इन रिलेशनशिप
मि.धुरी रिटायर्ड, तरी चार वाजता उठतात.
धुरीण बाई दोन वर्ष झाली फोटोत जाऊन बसलेल्या.
घरात मुलगा, सून विणा नी त्यांची नात वेदिका.
वेदिकाची आई दिवसभर कामानिमित्त बाहेर.
एका नामवंत कॉलेजात अकरावी बारावीची बुक किपींगची प्रोफेसर.
व त्यानंतर एका क्लासमध्ये शिकवायला जाई.
घरी येईपर्यंत रात्री नऊ वाजत.
छोट्या वेदिकाला संभाळायला मावशी ठेवलेल्या.
पण वेदिकाला आई हवी असायची.
आई आली की वेदिका तिला घट्ट लिपटे.
अगदी अगदी फेविकोलका जो़ड.
सकाळचा चहा मि. धुरी बनवत सर्वांसाठी.
घरात सगळं आवरुन केर काढत.
दूधवाला आला की दूध घेऊन तापवत.
संध्याकाळी नातीला फिरवून आणत.
वीणाला खूप आधार वाटायचा सासऱ्यांचा.
सुट्टीला दुपारी ती निजली असताना
वेदिकाने शी शू केली तर ते स्वतः तिला धुवायचे.
स्वच्छ टॉवेलने पुसून तिला आंगी चड्डी घालायचे.
एकदा वीणाची मावशी त्यांच्या घरी रहायला येते.
विणाची मावशी विजया हिने आई वडीलांच्या निधनानंतर
दोन भाऊ व वीणाच्या आईचे पालनपोषण केलेले असते.
त्यात तिचे स्वतः चे लग्नाचे वय मात्र उलटून जाते.
नुकतीच ती शाळेतून रिटायर्ड झालेली असते व
थोडे थोडे दिवस आपल्या भाचरांकडे राहू असा
प्लान करते.
वीणाचा तिला भारी लळा म्हणून व वेदिकालाही
बारश्यानंतर पाहणं झालं नसल्याने ती विणाकडे येते.
तिथे गेल्यावर ती रात्री वीणाच्या केसांना मस्त तेल लावून देते. डोक्याची चंपीमालीश करते.
मि.धुरींना लेक नसल्याने तो मायलेकींचा तेलमय
सोहळा ते बघत रहातात.
मग वेदिका व तिचा नवरोबा झोपायला गेल्यावर ती
आपला मोर्चा मि. धुरींकडे वळवते.
बरेच दिवस म्हणजे मिसेस धुरी गेल्यापासून मि.धुरींचा
केरम धुळ खात पडलेला असतो.
विजू त्यावरची धुळ झटकते व मि. धुरींबरोबर रात्री एक दिड वाजेपर्यंत खेळते.
सकाळी विजू सर्वांसाठी ताकातले पानगे व ओल्या लसणाची झणझणीत चटणी बनवते.
बऱ्याच दिवसांनी मि. धुरींना तोंडात लाळेचे कारंजे
उडत आहेत असं वाटतं.
दुपारी ती दोघं व नात घरी असल्याने छान गुरगुट्या भात व त्यावर मेतकूट असा बेत करते.
संध्याकाळी दोघं नातीला घेऊन तळ्यावर फिरायला जातात.
आत्ता रोज नाष्ट्याला मेदूवडे, धालिपीठ,घारगे असे रूचकर पदार्थ .
दुपारी सात्विक जेवण,
तद्नंतर चेस,केरम, पत्ते
संध्याकाळी चाय और घरगुती स्नेक्स.
नंतर बागेत फिरणं
वेदिकाबरोबर लपाछपी खेळणं,
रात्रीच्या सुग्रास जेवणानंतर
विजूसोबत शतपावली.
दिड दोन महिने अगदी मजेत.
मि.धुरीकी तबियत खूश.
ब्लड प्रेशर नार्मल.
हायपरटेंशन उडनशू.
डॉक्टरही मि.धुरींची हेल्थ इंम्प्रुव्हमेंट
देखके आश्चर्यचकित.
शेवटी न राहून विचारतातच,
मि.धुरी राज की बात बताओ यार.
जो मेरे गोलिओंसे न हो सका वो
मुमकिन कौन कर रहा है भाई?
मि.धुरी खुदकन हसतात,नव्हे लाजतात.
डॉक्टर ते हसू केमेऱ्यात केप्चर करतात.
तब्बल दोन वर्षांनी उमटलेलं हे दिलखुलास हसू.
डॉक्टर, वीणा व मि.धुरींच्या मुलाची विजीट घेतात.
वीणा या दिड दोन महिन्यात मावशीमुळे झालेला
चेंज सांगते.
ती म्हणते, काका आमचं घर पण हसू लागलयं नव्यानं.
डॉक्टर, मि.धुरी व मिस विजयांची विजीट घेतात.
अरे भाई दोनोंको शादी के लिए राजी जो करना है।
पण विजया म्हणते लग्न नकोच.
लिव्ह इन मध्ये राहू.
कबूल असेल तर हात पकडा.
मि.धुरी दोन पायांवर बसून तिचा हात हातात धरतात
व म्हणतात, कर हा करी धरिला शुभांगी...
डॉक व धुरींचा सन हा कोडेक मोमेंट केप्चर करतात.
छोटी वेदिका आजीआजोबांना
गोड गोड पापा देते.
घरी येताच घर त्या दोघांच अभिनंदन करतं.
फोटोतल्या मिसेस धुरी मि.धुरींना हळूच
डोळा मारतात व लगे रहो असे खुणावतात.
😍😍😘😘
# गीता गजानन गरुड.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा