लेकीचे प्रश्नोपनिषद
लेकीचे प्रश्नोपनिषद डॉ. लीला पाटील यांची 'लेकीचे प्रश्नोपनिषद' ही बापलेकी या कथासंग्रहातली कथा आज म्हणजे थोड्याच वेळापुर्वी वाचली. प्रसिद्ध लेखक ना. सी. फडके हे लीला पाटील यांचे वडील. लीला पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोलाची कामगिरी केली आहे. बी.एड, एम.एडसाठी तसेच इतरही शैक्षणिक पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. बऱ्याच पुरस्कारांच्या त्या मानकरी आहेत. २०२० मधे त्यांचे निधन झाले. लीला यांनी कथेत तिच्या बालपणीच्या, वडिलांच्या सहवासातल्या सह्रद्य आठवणी सांगितल्या आहेत. नंबरापाठी पळू न लावणारे बाबा, धाकात न ठेवणारे बाबा,फिरायला घेऊन जाणारे बाबा, भाषणांना घेऊन जाणारे बाबा अशी किती प्रेमळ छबी होती लेकीच्या मनात बाबांची नि हेच बाबा दौऱ्याला म्हणून गेले नि दुसरं लग्न करून आले..काय आघात झाला असेल त्या कोवळ्या मनावर! लीला तेंव्हा अडनिड्या वयाची होती. बाबा दुसऱ्या बायकोसोबत दुसऱ्या घरी रहायला गेले, त्यांनी नवा संसार थाटला तरी ते दिवसातनं दहाएक मिनटं पहिल्या संसारात जाऊन बसायचे तेंव्हा लेकीचा संताप अनावर व्हायचा, दुसरं लग्न केलत नं इथे कशासाठी येता..लोकांना मी आधीच्या बायकोचीही क...