पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दीपस्तंभ

इमेज
 #दीपस्तंभ  सीमा हल्ली तिच्या नवऱ्यावर, विशालवर सारखं रागावे.  त्यांच्या लग्नाला अवघी दोन वर्ष झाली होती. विशालने घरासाठी लोन घेतलं होतं. त्यामुळे साहजिकच सीमाला घरखर्चात काटकसर करावी लागत होती. शिवाय विशालच्या आईवडिलांना गावी मनी ऑर्डर पाठवावी लागत होती.  सीमाच्या वाढदिवसाला  विशालने तिला मोबाईल गीफ्ट दिला तेंव्हापासून हे असं चाललं होतं. आधी सीमा तिच्या संसारात खूष होती पण जेंव्हा तिने मोबाईलवर फेसबुक,व्हॉट्सऍप इनस्टॉल केलं तेंव्हापासून ती तिच्या जुन्या मैत्रिणींना फेसबुकवर शोधू लागली. कोणी अमेरिकेत रहायला गेली होती,कोणी सिंगापूरला.  ज्या भारतात होत्या त्याही शहरात रहात होत्या. चारचाकी गाडी चालवताना फोटो टाकायच्या तर कधी काश्मिरला,केरळला गेलेले नवऱ्यासोबत बागडत असतानाचे फोटो टाकायच्या. कधी मोना म्हणायची,"आज स्वैंपाकाचा कंटाळा आला. निषादला सांगायचा अवकाश. सगळं बाहेरुन मागवलं. पनीरचिली,कश्मिरी पुलाव,नान,डेझर्ट अन् कायकाय.." तर कधी तिच्याच बाजूला बसायची ती चैताली चारेक तोळ्याचा राणीहार, नवीन डिझाईनच्या बांगड्या परिधान करुन फोटो पाठवे व म्हणे माझा नवरा जाम हौशी आह...

एका अबोलीची गोष्ट

इमेज
 #एका_अबोलीची_गोष्ट का गं खिडकी बंद केलीस? सुयोगने संपदाला विचारलं तसं त्यांच्या तीन वर्षांच्या गोंडस सईला त्याच्या मांडीवर ठेवत संपदा तिला रागे भरली. "टेरेसमध्ये जायचं नाही. कित्तीदा सांगितलंय मनू तुला? का हट्टीपणा करतेस!" मम्माचा रागाने लाल झालेला चेहरा पाहून इटुकल्या सईला रडू आलं. तिने चांगलाच सूर लावला. तसं सुयोगने तिचे चिमुकले डोळे पुसले. "सई,चल आपण घोडा घोडा करुया" असं सुयोगने म्हणताच सई खूष झाली व ओणवा राहिलेल्या सुयोगच्या पाठीवर बसली. टबडक टबडक टबडक टबडक करत त्यांचा घोडा चालू लागला. हॉलला दोन फेरे मारताच बाबाघोड्याची ढोपरं दुखू लागली. तसं मग त्यांनी भातुकलीचा थाट मांडला.  एव्हाना मम्माचा राग ओसरला होता. मम्माने सईला भातुकलीसाठी सुकी फळं दिली. तिचे आवडते खारट पिस्ताही दिले. "हे बग बाबा येवला मोत्ता खाऊ दिला मम्माने" असं म्हणत सईने तिची इवलुशी खाऊनी भरलेली ओंजळ बाबाला दाखवली. तो खाऊ नीट छोट्या डब्यात ठेवून त्यांची स्वैंपाकाला सुरुवात झाली. अगदी आजीबाईसारखं बसून सईने खोटूखोटूचा वरणभात केला. आईबाबांना पानं वाढली. स्वतःला घेतलं. ते झाल्यावर खोटुखोटूचं आ...

बावळट कुठची!

इमेज
 #बावळट_कुठची! सुलेखाचं लग्न झालं अन् तिने सासरचा उंबरठा ओलांडला. आधीच आईवडलांच्या विरहामुळे ती कावरीबावरी झाली होती. त्यात शेजारपाजारची,घरातली,नातेवाईक सारीजणं तिच्याकडे  प्राणी संग्रहालयातल्या दुर्मिळ प्राण्याकडे पहातात तसं येऊन येऊन पाहू लागली व एकमेकांच्या कानात कुजबुजू लागली. हळूच हसू लागली. बिचारी सुलेखा पार गांगरून गेली. ज्या बायका तिला भेटायला येत होत्या.त्या तिच्या गळ्यातलं ,अंगठ्या,कानातली कुडी सारं काही निरखून पहात होत्या.मंगळसूत्र हातात घेऊन ते किती तोळ्याचं असेल हे खात्रीपूर्वक तिला सांगून तिच्याकडून खात्री करुन घेत होत्या.  काहीजणी हे काहीच नाही आमच्या सुनेचं किती मोठं गंठन आहे अशा बढाया मारत होत्या. सुलेखाचा हात हातात घेऊन बांगड्या सोन्याच्या की बेंटेक्सच्या असंही काहींनी तिला विचारलं. काहींनी त्या बांगड्या किती तोळ्याच्या असतील याचा अंदाज लावणं सुरु केलं. पण कुणी एकानेही सुनबाई तू किती शिकली आहेस, तुझे छंद कोणते, तुला कोणती पुस्तकं वाचायला आवडतात, तुझा आवडता पदार्थ कोणता असं तिला विचारलं नाही. हळूहळू पाहुण्यांची पांगापांग झाली. सुलेखा अजुनही अस्वस्थच होती....

मनी उवाच

इमेज
 #मनी_उवाच🐈 काय मग मंडळी,कसं काय बरंय नं! थंडी वाजतेय नं. अगं बाई,ओळख करुन द्यायची राहिलीच की. मी मीना मांजरेकरांची मनी. इथे अंगणात जरा उन्हाला बसायला आले होते. रात्रभर झोप नाही ओ . काय सांगणार तुम्हाला,अहो मांजरेकर भाऊ लई घोरतात नी त्याच्या वरच्या पट्टीत मांजरेकरीन घोरती.😾  रेकॉर्ड केलात तर एक छान संगीताचा कार्यक्रम होऊ शकतो. मला नुसतं कुडकुडायला होतं. दात दातावर आपटतात. पहिले मी चुलीजवळच्या रखेत निजायचे माजघरात. आत्ता मांजरेकर भाऊंनी गेस घेतला नं. चूल आहे पण कधी पेटवत नाहीत. मला सांगा बरं, माझ्यासारखीने काय करायचं? आधीच माझं अंग कसं मऊ मऊ, जरा थंडीची झुळूक आली की अंगावर शहारा येतो बाई माझ्या. थंड हवा मानवतच नाही मला. लगेच घसा धरतो माझा. खोकला येतो.  रात्रीची मी किनई मांजरेकरांच्या बाबूच्या अंथरुणात शिरते. मध्यरात्रीपर्यंत मोबाईल सुरु असतो बाबूचा. ते काय ते शोना,पिल्लू चालू असतं बाबूचं.💏मग वरती नीज येत नाही प्रकाशामुळे म्हणून त्याच्या पायाजवळ नीजते तर बेणं रात्रीचं लाथा घालतं माझ्या कंबरड्यात. झोपेत फायटींग करतं वाटतं. माझा बिचारीचा जीव जातो हो. कसलं कळवळायला होतं. ...

सासुबाई माझं चुकलं!

इमेज
 #सासुबाई_माझं_चुकलं! सत्यभामा काकूंनी एकटीच्या जीवावर उमेशला लहानाचं मोठं केलं होतं.  उमेशचे वडील नेहमी आजारीच असायचे.  त्यामुळे संसाराचा गाडा तिनेच तिच्या खांद्यांवर लिलया पेलला होता.  चिवडा,लाडू बनवून आजूबाजूच्या दुकानांमध्ये,जवळच्या ऑफिसांमध्ये ती विकायला ठेवी. उमेश वयात येताच तोही आईला या कामात जमेल तशी मदत करी.वडील मधुमेहामुळे कायम आजारीच असायचे.  उमेश सॉफ्टवेअर इंजिनिअर झाला व त्याला कँपसमधून बक्कळ पगाराची नोकरी मिळाली.  त्याने आईला फोनवरुन ही बातमी कळवली व घरी यायला निघाला. आईने हलवायाकडून कंदीपेढे आणले व उमेश आला तसे देवासमोर ठेवले व देवाला प्रार्थना केली की असाच माझ्या लेकराच्या पाठीशी रहा.  उमेश आईच्या व वडलांच्या पाया पडला.  अति मधुमेहामुळे त्यांची आताशा वाचाही गेली होती.  काय हवं नको ते सांगण्यासाठी सत्यभामाकाकूंनी त्यांच्याजवळ एक बेल ठेवली होती.   त्यांनी बेल वाजवली की काकू त्यांच्याजवळ जात. ते खुणेनेच काय हवंय ते सांगत.अगदी लहान बाळाची करतात तशी सेवा सत्यभामा काकू आपल्या नवऱ्याची करत होत्या.  उमेशने त्यांच्या पाय...

सावीचं भावी सासुबाईंस पत्र

इमेज
 #सावीचं_भावी_सासूबाईंस_पत्र प्रिय भावी सासूबाईंस,                     साष्टांग नमस्कार सासूबाई,तुमचं पत्र वाचलं.पत्रातलं प्रत्येक वाक्य मनाला भावलं.या पत्राद्वारे मला तुम्ही बर्याचशा उमगलात.आजुबाजूला सासूबद्दल कायचेकाय बोलतात.त्यामुळे मी जरा टेंशनमध्येच होते.पण तुमचं पत्र वाचलं अन् मनावरचा ताण बराचसा निवळला. गाडीतून जातायेताना,कार्यालयात सासुविषयी बरेच नकारात्मक संवाद कानी येतात.कुणी म्हणते,माझी सासू नुसती घालूनपाडून बोलते,टोमणे देते,आईवडलांचा उद्धार करते..कुणी म्हणतं,सासू म्हणेल तीच भाजी आमच्या घरात शिजते,...कितीही चांगलं बनवलं तरी मुळीच कौतुक करत नाही...सारखं नणंदेची वाहवा करते. कुणी म्हणतं,मुलांना मारलं,बोललं तर रागावते..फुगून बसते...जरासं जास्त होटेलींग केलं तर घरचं खायला काय होतं म्हणून विचारते...एकीला तर दिवस गेलैत अन् तिची सासू म्हणते माझा नातू येणार...ती बिचारी टेंशनमध्ये आलीय,मुलगी झाली तर?🤔ह्या डिप्रेशनमध्ये जातील की काय...एकीला दोन मुली आहेत तर तिची सासू रोज तिच्याकडे नातवासाठी हट्ट करते.. काहीच्या सासवा तर घरात पाकातल्...

सावीच्या भावी सासुबाई

इमेज
 #सावीच्या_भावी_सासूबाई आज सावीला सकाळीच एक बंद लिफाफा बाजूच्या काकूंनी आणून दिला.काल सावी घरी उशिरा आली म्हणून काकूंनी दार ठोकवलं नव्हतं.घरात ती एकटीच होती.आईबाबा व लहान भाऊ गावच्या घरी गणपतीला गेले होते. सावीने लिफाफ्यावरचं नाव वाचलं, सौ.वसुंधरा श्रीकांत सावंत.सावीच्या लक्षात आलं,अरे हीतर अमोलची आई.अमोल, तिचा प्रियकर कम भावी पती. जराशा धाकधुकीनेच सावीने लिफाफा उघडला.काकू जायला निघाल्या तसं.सावी त्यांना म्हणाली,"काकू,तुम्ही पण ऐका". काकू सावीच्या शेजारी बसल्या. प्रिय भावी सुनबाईस(सावी),                        सावीबाळा तुला खूप खूप आशीर्वाद. चार दिवसांपूर्वी अमोलने आमच्यावर बाँबच टाकला.मी माझं जमवलय म्हणाला.मला तर बाई अगदी टेंशनच आलं.मग ह्यांनी तुझ्या बाबांची भेट घेतली, त्यांची बोलणी झाली व मला येऊन सांगितलकी आपल्या अमोलची आवड उत्तमच आहे.काही घाबरायचं कारण नाही.तेंव्हा कुठे माझा जीव भांड्यात पडला बाई. लग्नपण तुम्हाला डिसेंबरमध्ये करायचंय.अडीज तीन महिन्यात सगळी तयारी करावी लागेल नं.ए पण ते ओनलाईन नको हं मागवू.आपण किनई दादर ...

उपरती

इमेज
 #उपरती क्षमा काकू व गोविंदकाका ठाण्यातील श्रीरंग सोसायटीत  रहात होते.  याच घरात सिद्धेश व सिद्धीचा जन्म झाला. दोघांत दोन वर्षांच अंतर होतं. घर नुसतं मुलांच्या किलबिलाटाने भरलेलं असायचं. भिंतींवरती रेघोट्या,चिमणपाखरं,आई,बाबा,आजी,आजोबा, बागुलबुवा, जोकर..काय मनाला येईल ते रेखाटलेलं पिल्लांनी.  क्षमाताईंची सासू भजनाचे क्लासेस घ्यायची, देवळात. त्यामुळे घरातलं सगळं क्षमाकाकूच पहायच्या. सासऱ्यांच व तिचं छान जमे. दोघांनाही गोष्टीची पुस्तकं वाचण्याची फार आवड. सासरे क्षमा काकूला छान छान पुस्तकं आणून देत वाचायला. दोघं पुस्तक वाचून झालं की त्या गोष्टींतल्या पात्रांवर चर्चा करीत. क्षमा काकूंची सासू सुगरण होती. ती वेळ असला की क्षमाला पारंपारिक पदार्थ शिकवे. क्षमाला ते येत असायचे पण तरीही ती परत सासूच्या क्रुती पाही. त्यातलं नवीन काही असेल ते शिकून घेई. सासूलाही मग तिचं अप्रूप वाटे कारण त्यांच्या भजनीमंडळात एकेकजणी आपापल्या सुनेचे पराक्रम सांगून टीपं गाळत. क्षमाची सासू क्षमासारखी गुणी सून लाभल्याबद्दल देवाचे आभार मानी.  सिद्धीही आजीसोबत भजनीमंडळात कधीमधी जाई. तिलाही भजनाची,भक...