पोस्ट्स

मार्च, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाल

इमेज
 गीता गजानन गरुड. आंब्रड. #पाल🦎 पाल हा प्राणी भिंतीवर पाहिला की मला धडकीच भरते.लहान झुरळ दिसलं तर मी सरळ हाताने चापटी मारते.ते लगेच गतप्राण होतं.मोठं झुरळ आलं तर फुलझाडूने त्याचा खातमा करते.आमच्या घरात झुरळं टिकत नाहीत.दिवसातून दोन वेळ लादी पुसणं असतं त्यामुळे भुकेलं रहाण्यापेक्षा झुरळं आमच्याकडे न येणंच पसंत करतात. पण पालीला मात्र मी लय घाबरते.ती अशी सरसर जातेना,तिला बघून अंगावर काटाच येतो माझ्या.😰सहसा आमच्या खिडक्या बंदच असतात.जाळीच्या तेवढ्या उघड्या.पण तरीही जरा कुठे खिडकी किंवा दार उघडं राहिलं तर पाल मोकेपे चौका मारतेच आणि आमच्या घरात प्रवेशते.ती भिंतींवर दिसली की तिचे डोळे👀 मलाच रोखून पहात आहेत असं मला वाटत रहातं. एकदा आठवीत असताना खाटीवर बसून आम्ही तिघं भावंडं घरचा अभ्यास करत होतो.कौलांच घर होतं.कौलांतून एक मोठी पाल🦎 खाली पडली,डायरेक्ट माझ्या फ्राकमध्ये.मी चटकन उडी मारली.पण नंतर आईने मला केसांरुन न्हायला लावलं.तुळशीला दिवा लावला. एकदा माझे यजमान चार पाच दिवसांसाठी गावी गेले होते.उन्हाळ्याचे दिवस..कुठुनतरी पालीने आमच्या घरात एन्ट्री मारली.जसं मी चहा पीत नाही तसा माझा मुलगा...

कातरवेळ

इमेज
 गीता गजानन गरुड. आंब्रड. #कातरवेळ सोसायटीतले सीनिअर सिटीझन्स पावसाळ्यात दोन दिवस सावंतकाकांच्या गावच्या घरी फिरायला जातात. सकाळची गाडीने प्रवास करायचे ठरते पाच महिला व पाच पुरुष समोरासमोर बसतात.  सुनंदाने थर्माससमधून आणलेला आलं, वेलची घातलेला चहा कागदी कपांतून सर्वांना देते. गाडी चालू असताना असा सुनंदाच्या हातचा घरचा चहा अगदी फर्मास लागतो. त्याबरोबर खायला गुलाबच्या सुनेने बनवलेल्या कुकीज गुलाब सर्वांना देते. सगळीजणं गुलाबच्या सुनेच्या बेकींग प्राविण्याचं कौतुक करतात. गाण्याच्या भेंड्या ताल धरु लागतात. एकापेक्षा एक हिंदी गाणी, है प्रित जहाँ की रित सदा, मैं गीत वहाँ के गाता हूँ भारत का रहेनेवाला हूँ भारतके गीत सुनाता हूँ..खोतकाका तालात गातात. बाकी मंडळी त्यांच्या सुरात सुर मिळवतात. गुलाब गाते,होठोंपे ऐसी बात मैं दबाके चली आई खुल जाये वही बात तो दुहाई हो दुहाई। कोरगावकर सुरु करतात,इन्ही लोगोने इन्ही लोगोने ले लिया दुपट्ट मेरा... रमा गाते,रात्र काळी घागर काळी यमुना जळे ही काळी ओ माय बुन्थ काळी बिलवर काळी  गळामोती एकावळी काळी ओ माय..। बने गातात, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्...

आनंदाश्रू

इमेज
 #आनंदाश्रू सकाळी सातची वेळ, शांताराम अण्णांना जोरात प्रेशर आलं होतं पण घरात मुलाची,नातवाची आवरायची लगबग होती. खरंच होतं ते. डोंबिवलीतला वन बीएचकेचा ब्लॉक, तो सुद्धा चाळीतली खोली विकून घेतलेला.  अण्णा करीरोडला एका प्रायव्हेट कंपनीत कामाला होते.रोज सकाळी साडेसहाला घर सोडायचे. ओव्हरटाईमकरुन रात्री उशिरापर्यंत घरी यायचे.  आताशा दोन महिने झालेले, अण्णांना रिटायर्ड होऊन. पहिली पहिली ही हक्काची सुट्टी बरी वाटली त्यांना. थोडे दिवस गावी जाऊन आले पण तिथेही थोरला भाऊ नोटांची पुडकी मागू  लागला. पहिल्यासारखं आदराने बोलेनासा झाला. शेवटी अण्णा आठवडाभर राहून पत्नीसोबत माघारी आले. घरी आल्यावर मयंकच्या (मुलाच्या) चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतंच,"रहाणार होतात ना,इतक्या लवकर कसे परतलात?" काही वाक्यं चेहऱ्यावर वाचता येतात. त्यासाठी शब्दांची आवश्यकता नसते आणि अशी वाक्यं आपल्या पोटच्या मुलाच्या चेहऱ्यावर पेरलेली पाहणे याहून क्लेशदायी काही नाही. "आणायची कोठून प्रत्येकाला द्यायला नोटांची पुडकी? अरे मी काय टाकसाळीत होतो का?" अण्णा स्वतःशीच बोलले व कुशीवर वळून निजले पण त्यांना आत्ता थोपवेना. ते ...

मी एक चिमणी

इमेज
 पहिलं माहेर अगदी जवळ होतं दहा मिनटांच्या अंतरावर. सुट्टी पडली की भाच्या फोन लावायच्या,"आत्ते,आज येऊ तुझ्याकडे?" मग या म्हणून सांगायचा अवकाश..सायकली हाकीत यायच्या दोघीही..आधीच गोर्यापान..उन्हाने लालगुलाबी होऊन यायच्या.  मोठी पक्की शाकाहारी..तिला तूपभात दिला तर आवडीने खाते नि छोटी माझ्या लेकासारखी चिकनमासे खाऊ. काय बनवून घालेन ते तिघं मिळून खायची..मग नवा व्यापार काढायचे..थोडा वेळ पैश्यांच्या वाटण्या. छोटू बँक व्हायची..आम्ही तिघं खेळायचो.  ते झालं की एसी सुरु करुन हवा असायचा. थोडं थंडात पडायचे..परत तीन दप्तरं काढायचे..त्यात काय भेटतील त्या वह्यापुस्तकं भरुन ए भंगारवाले करत बेडरुमधून हॉलमधे फेऱ्या मारायचे. मग दादासोबत कॉम्पुटरवर गेम चालायचा. छोटूला त्यात इंटरेस्ट नसायचा. ती ब्रश,रंग,पाणी,वही,स्केचपेन घेऊन कलाकारी करण्यात मग्न असायची. कधी अंधारघुडूप करुन पिक्चर लावून तंगड्यात तंगड्या घालून बघत बसायचे. एकदा तर भूताचा हनिमुन म्हणून पिक्चर लावला..माझी इकडे हवा टाइट..काय बघतायत नि काय नाय. ठीकठाक होता पिक्चर.  एकदा छोटूला घेऊन बँकेत गेले..एन्ट्री करुन आणायला. उन्हात छोटू लाल...

मी संकेत

इमेज
  मी संकेत मी संकेत सावंत, सध्या सत्तावीस सुरु आहे. घरात पाय टाकताच आई लग्नाचा विषय काढायची. लग्नासाठी मुलगी शोधत होतो पण मिळत नव्हती. बीए बीएड आहे मी. एका प्रायव्हेट शाळेत शिक्षक आहे.  तीनचार स्थळं बघून झाली.  मुली थेट नकार कळवायच्या. त्यांना सरकारी नोकरी हवी असते. एमपीएससी तीनदा दिली पण नाही जमलं मला ते. आपलं लकच खराब. गेल्याच महिन्यात एक स्थळ पहायला गेलो होतो. मुलगी नाकीडोळे छान होती. कांदेपोहेही झक्कास होते. मुलीच्या वडलांच्या जास्त अपेक्षा नव्हत्या. तिथेच ठराव वगैरे केला. रात्री मला त्या मुलीचा फोन आला. माटुंग्याच्या ब्रीजवर भेट म्हणाली. मी जाम खूष. रात्री स्वप्नात तिला कुशीत घेऊन झोपलो. तिच्या नाजूक बोटांशी चाळा केला. तिच्या सुंदर ओठांवर बोटं फिरवली.  अजून पुढचं स्वप्न साकारायच्या आधीच आईचा आवाज,"बंड्या,संडासाजवळ लाईन नाय हाय. मी जाऊन आले. तिनपाट घेऊन नंबर लाव जा तुझा." आयला,चरफडतच उठलो. मनात म्हंटल,'ही आई सध्या असं बोलतेय. उद्या लग्न झाल्यावर माझ्मा बायकोसमोर असं बोलली तर काय ईज्जत राहील माझी.  आधी आईला ट्रेनिंग द्यायला हवं असं ठरवून मी तिनपाट भरुन घेतलं ...

माळा

इमेज
 माळा हा शब्द आता तसा हद्दपार झाला आहे. आमच्या चाळीतल्या घरात लाकडी फळ्यांचा माळा होता. या माळ्याच्या एका कोपऱ्यात दांडीवाला पंखा होता. एका वास्याला ट्युबलाइट लावलेली होती तर दुसऱ्या कोपऱ्यात एकावर एक दोन ट्रंका ठेवलेल्या. त्यात गोधड्या,चादरी,वगैरे ठेवलेल्या असायच्या. माळ्याच्या तिन्ही बाजूंना जाडजूड पुठ्ठे लावलेले होते. शेजारच्या माळ्यावर शशीची आजी निजायची. तिच्या नि आईच्या तिथूनच आज काय बनवलेलंपासून काय दुखतय पर्यंत गप्पा रंगायच्या.  डाव्या बाजूच्या घरातल्या मामी बाबा घोरताना श्वास कोंडत असला तर आईला सांगायची,माई कुशीने झोपायला लावा.  माळ्याचं छप्पर कौलांचं होतं. एक कौल काचेचं होतं..त्यातून उजेड यायचा. बिछान्यांचे रोल करुन ठेवले की याच माळ्यावर मी अभ्यासाला बसायचे. पुस्तकावर येणारा धुळीकणमिश्रित कवडसा मला फार जवळचा वाटायचा. त्यात बोटं घालून त्याला मधेच अडवायला आवडायचं मला.  या फुट्ट्यांवर कितीतरी गणितं सोडवली..रासायनिक अभिक्रिया लिहिल्या..अंगात कुठूनशी शिक्षिका यायची नि अद्रुश्य मुलं माझ्यासमोर बसायची..मग मी फळा,खडू आणि ती मुलं एकरुप व्हायचो. मांजरही फिरायची रात्री...

अ ल क

इमेज
 अ ल क १.रोज ओटीमधे बाळांना जन्म देतेसमयी बायांना मरणाच्या दाढेतून परत येताना पहाणारे,बाळ जन्माला आलं कि त्या प्रसववेदना विसरुन बाळाला कुशीत घेण्यासाठी आसुसलेले माऊलींचे डोळे पहाणारे डॉ. अनामिक महिला दिनाच्या शुभेच्छा वाचून मनात म्हणाले,"या माऊलींचे स्मरण तर दर क्षणाला झाले पाहिजे." *************** २.तिच्या लेकीवर एकतर्फी प्रेमातून एसिड हल्ला झाला होता,प्राजक्तासारखा नाजूक चेहरा..जळून विद्रुप दिसत होता ..आणि कॉलेजात शिकणाऱ्या काही मुलांनी त्या इस्पितळाला भेट दिली. महिलादिनानिमित्त ते फुलं वाटत होते..त्या माऊलीच्या जवळचं फुल मात्र कुणा नराधमाने उमलायच्या आधीच करपवलं होतं.  ******************* ३. आई,मला आज उशीर होईल गं फोनवर सांगणारी ती परत आलीच नव्हती. काही वासनांध नरपशूंच्या वासनेची शिकार बनली होती..कोणाताही पुरावा मिळू नये म्हणून तिच्या म्रुतदेहाचे बारीक तुकडे करुन पोत्यात भरुन निर्जन ठिकाणी ठेवलेले..पोलिसांना नेमका महिलादिनी तिच्या लेकीच्या शवाचा ट्रेस लावला होता.  **************** ४. काल रात्री बारानंतर त्याने महिला दिनानिमित्त भली मोठी पोस्ट टंकली. पहाटे उठून त्यावर प...