नजरेने माप
नजरेने माप
मला कुणी सांगितलंं मोदकाच्या साहित्यकृतीची मापं द्या तर एक वाटी तांदूळपिठी, एक वाटी पाणी, अर्ध्या नारळाचा चव, पाव वाटी गुळ किंवा थोडा जास्त, कुटलेली वेलचीची चारेक बोंड. हे असं लिहिणं नि वाचणं म्हणजे थिअरी झालं. थिअरॉटीकल पार्ट कितीही मुखोद्गत केला तरी practice makes a man perfect या इंग्रजी उक्तीनुसार मोदक तेही उकडीचे करायचे तर ते आई, आजीच्या हातचे निरीक्षणातून शिकावे.
आमच्याकडे दर संकष्टी चतुर्थीला मोदक व्हायचे. आई पिठाची उकड घेऊन बसली की मी तिच्यासोबत बसायचे. आईसारख्या मला कळ्या पाडता यायच्या नैत मग आई सांगे, "मलाही लहान असताना कळ्या पाडणं जमत नव्हतं. मी अगदी लहानपणापासनं उपवास केले. चतुर्थीला चुल सारवून नंतर मोदक करायला बसायचे. कळ्या येत नव्हत्या म्हणून मग चार पाकळीचा मोदक करायचे." हे असं सांगता सांगता आईच्या तळहातावर चार पाकळ्यांचा मोदक तयार झालेला असे. अगदी पारिजातकाचं फुल जणू, मग मीही तसाच करू लागले.
दर संकष्टीला माझी बोटं <script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-7389619452372445"
crossorigin="anonymous"></script> अधिकाधिक चांगलं वळण देऊ लागली. त्या पारीत सारण भरून मग जमतील तशा बारीक कळ्या पाडून सुबक मोदक तयार करता आला की तो तळहातावर घेऊन दाखवण्यातही मौज होती. मीच असं नाही. माझा धाकटा भाऊही बसायचा कळ्या करायला. त्यालाही आवडायचं ते काम.
पिठाची उकड मात्र नजरेनेच शिकले तसंच किती नारळाच्या चवास किती गुळ घ्यायचा हे डोळ्यांनी बरोबर समजू लागलं.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा