वैशाखराणी
वैशाखराणी
©®गीता गरुड.
नेसली आकाशी जरतारी
दिमाखात वैशाखराणी
आकाशी रंगावर खुले
गुलाबी शाल्मलीची खडी
वैशाखराणीच्या स्वागता
पायघडी सोनमोहराची
ल्याली कंठीहार कण्हेरीचा
आणिक पैजणे सुरंगीकळ्यांची
कानी बहाव्याचे डूल
नाकात पलाशाची नथ
देवचाफ्याचे हो बाजूबंद
केसांत सुवासिक अनंत
सोनसळी पदर अंगावर
फुललाय ताम्हण डोळ्यांत
अमलताश नि गुलमोहर
भाळी हळदीकुंकूम रेखीव
रेशीमपाऊले उमटवीत आली
निसर्गराजाची साजिरी लेक

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा