आपलं माणूस

 गीता गजानन गरूड.

आंब्रड.


आपलं माणूस


दामु फार कष्टाळू माणूस.

पदरात शैतीचा तुकडापण नव्हता.एक बायको,दोन मुलं नी वर्षभर खोकणारी म्हातारी आई हे त्याचं जग.

या त्याच्या माणसांसाठी तो राब राब राबे.

कधी कुणाची कौले शाकारी,कधी कुणाला माडाचं चुडात वळून देई.

कुणाची चार कापून देई.

अशी मिळेल ती कामं करायचा.

दामूची बायकोपण दुपारची, रात्रीची गोधड्या शिवायची.

कोण बाळंतीण झालं तर बाळबाळंतीणीची मसाज,अंघोळ अशी काम करायची.

एक म्हातारी आजी होती.

तिची सगळी पिलावळ बाहेरगावी.

 तिला उठून बसतापण येत नसे.


दामुची बायको दुर्गा तिला न्हाऊमाखू घाले.

मऊसर वरणभात करुन भरवे.

म्हातारी फक्त शरीराने अधू होती.तोंडाने नाही.

भरभरुन आशिर्वाद देई ती दुर्गाला.महिन्याला दोन हजार रुपये देई. 

तितकीच तिच्या संसाराला मदत.

दुर्गा सासूचं सगळं करुन बाहेर कामाला जाई.

 पण सासूला ती डोळ्यासमोर हवी असे. 

सासूच्या लेकी आल्या की सासू त्यांच्यापुढे सुनेची गार्हाणी मांडी.

सून लक्ष देत नाही.दिवसभर बाहेर जाते....


एकदा दुर्गाच्या नणंदेचा अपघात होतो.तिला जाम मार लागतो.हात फ्रेक्चर होतो.

पायाच्या हाडांत क्रेक जातात.

अशा परिस्थितीत तिचा नवरा तिला इस्पितळातसून सरळ तिच्या माहेरी नेऊन सोडतो.

दुर्गा नणंदेबद्दल कोणताही पुर्वग्रह मनात न धरता नणंदेची सेवा करते.

पाच सहा महिन्यांनी नणंद हिंडू फिरू लागते.

तिला दुर्गाबद्दल आपण किती चुकीचे विचार करत होतो हे आठवून पश्चाताप होतो.

तिच्या आईलाही आत्ता तिची सून आवडू लागते.


ती म्हातारी जिला दुर्गा न्हाऊमाखू ,जेवूखाऊ घाली ,ती दुर्गाला एकदा तिच्याजवळ बसवते व दुर्गाला तिने साठवलेले दोन लाख रुपये,चार सोन्याच्या बांगड्या,राणीहार,मोत्याची नथ,कुडी,बुगडी,बाजूबंद यांनी भरलेला डबा देते.

दुर्गाला सांगते, "हे मी तुला प्रेमाने देतेय बाळा.याचा स्विकार कर.

काल मी लेकाला फोन लावून मला बघायला ये म्हणून सांगितलं तर लेकाने मला सांगितलं की शेजार्यांना सांगून ठेव.

तुझं बरंवाईट झालं तर तुम्हीच करा म्हणून.

मी सध्या पत्नी व मुलांसोबत वेकेशनवर आहे .

आम्हाला आमचं लाईफ एन्जॉय करुदे.

आत्ता माझा या सर्व नात्यांवरचा विश्वास उठला आहे.

तु माझी म्हातारपणात आपलं माणूस म्हणून सेवा करतेस.तुझं नी माझं नात काय?

माझी माणसं पैशाने श्रीमंत आहेत पण खरी श्रीमंती मनाची ती तुझ्याजवळ आहे दुर्गा.

आजपासून तुम्ही माझ्या वाड्यावर रहायचं.

माझ्यानंतर या वाड्याची मालकीण तु."


दुर्गा म्हातारीच्या पाया पडते दोन दिवसांनी ती सर्वजण आपली चार भांडीकुंडी गोळा करुन म्हातारीच्या वाड्यावर रहायला जातात.

दुर्गा वाड्याची साफसफाई करी.

म्हातारीची काळजी घेई.

म्हातारी गोडधोड खायला मागे.

मग दुर्गा तिला ती मागेल ते करुन घाली.

दोन्ही म्हातार्या मिळून गप्पा मारीत.

दुर्गाचे कौतुक

 करीत.


एक दिवस म्हातारीचा मुलगा एका बिल्डरला घेऊन तो 

वाडा विकण्यासाठी येतो.

कोर्या कागदावर म्हातारीची सही मागतो.

म्हातारी त्याला नकार देते.

त्याला म्रुत्यूपत्र देते.

त्यात तिने लिहिलेले असते की माझ्या म्रुत्यूनंतर सगळी संपत्ती ती दुर्गाला देणार.

मुलगा खाली मान घालून हात हलवत परत जातो.

म्हातारी दुर्गेच्या कुटुंबातलाच एक घटक होते व भरपूर वर्ष सुखाने जगते.


#गीता गरुड.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरी गोम

ताई, धर माझे पाय!

ए पिस ऑफ वेलवेट