मी बाळ बोलतोय!


 गीता गजानन गरुड.

आंब्रड.


#मी_बाळ_बोलतोय!


कसली भारी शंभो घालते मला आजी माझी.

मला थोडथोडसं आठवतं,आईच्या पोटात होतो तेंव्हाचं.

आईने काही जास्त,तिखट,तेलकट खाल्लं की मला त्रास व्हायचा.

आईच्या पोटातल्या पाण्यात सु$$ई करुन पोहायला लय मजा यायची.

मी आईच्या पोटाला जाम कीक मारायचो.

मला त्या अंधार्या जागेतून बाहेर पडायचं होतं.

एकदा काय झालं,आईने पाणीपुरी खाल्ली भरपूर.

गीता गजानन

भैया और दो,और दो करत होती.

मला सगळं ऐकू यायचं.

त्या पाणीपुरीने एसिडीटी वाढली.


आईला जोराच्या उलट्या झाल्या.

माझी स्थिती वादळात जहाज भरकटतं तशी झाली.

मी इकडून तिकडे आईच्या पोटात फुटबोलसारखा

रात्रभर उड्या मारत होतो.

सकाळी जरा शांत झोपलो.

अगदीच गाढ झोपलो.

चार पाच तास झाले असतील,माझी काहीच हालचाल

नाही म्हंटल्यावर आई,आजी जाम टरकल्या.

देवाला पानं ठेवली.

गार्हाणं घातलं व दवाखान्याकडे जायला निघाल्या.

आईला तर चालताच येत नव्हतं.

गीता गजानन

मी म्हंटलं,हवी अजून पाणीपुरी?नायतर काय हिच्या पाणीपुरीमुळे माझा फुटबॉल झाला ना.

थोड्या अंतरावर रिक्षा मिळाली.

रिक्षात बसलो,तुम्हाला सांगतो,एवढे खड्डे त्या रस्त्याला,

टुणटुण उडायला लागलो मी.

खडबडून जागा झालो.

दवाखान्याजवळ रिक्षा थांबली.

डॉक्टरांनी आईला तपासलं.


त्या रिक्षातल्या धक्क्यांमुळे मला जाम स्पीड आला होता की ओ.

मी त्या स्पायडरमनसारखा इकडून तिकडच्या भिंतीला लटकत होतो.

डॉक्टर आजीला म्हणाले,बाळाचे ठोके जाम स्पीडमध्ये

पडतायत.

डॉक्टरकाकांनी त्यांच्या मिसेसला(स्त्रीरोगतज्ज्ञ) बोलवून घेतलं.

त्यांच्यापण पोटात बाळ होतं.म्हणून डॉक्टरकाका तसंच काही अर्जंट असलं तरच त्यांना बौलवायचे.

झालं,आईला कसला तरी पाठीमागे नाड्यांचा गाऊन घातला.

आजीकडून सिझरची परवानगी घेतली.

मी एवढा अशक्त झालेलो की माझ्यात बाहेर यायचं त्राणचं  राहिलं नव्हतं.


तो भूलवाला डॉक्टर आला.

त्याने आईच्या कमरेत भलमोठं इंजेक्शन ठोकलं.

हळूहळू आई गाढ झोपली.

मी अगदी वरती आलेलो,आईच्या छातीच्या जरा खाली.

भुलतज्ञ आईच्या डोक्याजवळ उभे होते.

गीता गजानन

भुलतज्ञ आईच्या वरच्या बाजूला व डॉक्टर आईच्या डाव्या बाजूला.वाँर्डबाँय उजव्या बाजूला.

या सर्वांनी मला हळूहळू दाब देऊन खाली आणलं.

पोटाला चीर देऊन डॉक्टर काकांनी मला बाहेर काढलं.

मी अगदीच ग्लानीत होतो.

सिस्टरने मला टबात आंघोळ घातली. छान मऊ कपड्याने पुसलं.

इकडे आईला टाके घालण्यापुर्वीच जाग आली.

एकेक टाका तिच्या डोक्यात घण घालत होता.

डॉक्टरकाका तिला  झालंहा,थोडचं करून शांत करत होते.


मी रडतच नव्हतो.जाम दमलेलो,रडणार कुठून.

मेडम मला घेऊन बेबी इज नोट क्राइंग करत इकडून तिकडे फेर्या मारत होत्या.

त्या लयच टेंशनमध्ये आलेल्या.

माझ्या इवल्याशा तळव्यांवर टिचक्या मारत होत्या.

शेवटी मी वैतागून रडायला लागलो.

तेंव्हा कुठे मेडम खुदकन हसल्या.

मला सिस्टरने आजीकडे नेऊन दिलं.

मग आईला दोघांनी उचलून एका स्ट्रेचरवर ठेवलं

व वार्डमध्ये आणलं.

परत तिला स्ट्रेचरवरून खाटीवर ठेवलं.

मग मला थोडा वेळ आईच्या कुशीत ठेवलं.


मी फुटबोलसारखा उड्या मारुन काळानिळा पडलेलो.

डॉक्टरकाकांनी मला एका बल्बखाली ठेवलं.

दुसर्या दिवशी सकाळी आई मला दुधू देणार असं ठरलं.

तिने मला मांडीवर घेतलं आणि मी जे फुलं टू अनुभव असल्यासारखा दुधू प्यायला सुरुवात केली,आजुबाजूच्या बाया तोंडात बोटं घालून लागल्या बघायला.

गीता गजानन

सात दिवस दवाखान्यात होतो.

सकाळी थोडा वेळ, आजी मला नंगू करुन  कोवळ्या उन्हात धरायची.

आई जरा जरा चालू लागली होती.

बाबा तर सात दिवस माझ्या कुशीलाच बसून असायचे.

रात्रीची आजी.

सातव्या दिवशी रिक्षातून मला घरी आणलं.

घरी आणल्यावर माझी पाचवी केली.

आत्ता माझी मजा चाललेय.


रोज रात्री मामा छान मालीश करतो.

मी बरोबर मध्यरात्री सगळं ओलं करतो नी टँटँ करून सगळ्यांच्या झोपेचं खोबरं करतो.

काय करणार जोराची लागते,थांबवतच नाही.

मग देतो सोडून.लयच गार लागलं की रडतो.

मग आई मला कापडातून सोडवते.परत दुसर्या फडक्याने बांधते व दुधू देते.

मग परत माझा डोळा लागतो.

मामाने खिडकीला फुगे बांधलेत.

तेना वार्याबरोबर हलतात.

त्यांच्याबरोबर खेळायला मला जाम आवडतं.

आजोबा,बाबा,मामा प्रत्येकजण मला घ्यायला नंबरच लावून बसलेले असतात.

मी म्हणजे एकदम विआयपी पर्सन.

सगळीजणं माझ्याशी गोड गोड बोलतात.

मला हळूहळू कळेल यांची भाषा.


आजी तर आईला सूप,दूध,खीर शिरा,लाडू असं सारखं कायकाय खायला देत असते.

आईने खाल्लं की तिच्या दुधूतून ते मला मिळतं.

मोठा झालो ना की मला दात येणार.मग मीपण 

डायरेक्ट खाणार ताटात घेऊन मोठ्ठया माणसांसारखं.


आत्ता बघा आजीने  माझी तेल लावून मालीश केली.

माझे पोट,पाठ,हात,पाय चांगले रगडले.

नाकाला हळूहळू शेप दिला.

मग गरम पाणी बादलीत ओतून घेतलं.

त्यात जरा गार पाणी घातलं.हात घालून किती गरम आहे ते तपासलं.

मग तीने आंबेहळद व चण्याचं पीठ वाटीत घेतलं.त्यात थोड दूध घालून पातळ केलं.

मग मला पायांवर घेऊन बसली.माझ्या पुढच्या अंगाला उटणं चोळलं.मला पालथं करून पाठीला,पायाला सगळीकडे उटणं लावलं.

मग पाण्याने मला न्हाऊमाखू घातलं.


परत साबण लावला की ओ सगळ्या अंगाला.

परत ऊन ऊन पाण्याची शंभो.

आत्ता आजी मला मांडीवर बसवते नी माझ्या डोळ्यांवर हात धरुन तांब्याने डोक्यावर पाणी घालतेय.

कानात फुंकर मारते.

आई पातळ फडकं घेऊन मला घ्यायला उभीचं आहे.

आई मला पुसून काढते.

तोपर्यंत आजी ओवा,धुप घालून धुरी करते.


मग मला आजी चांगला तंदूरीसारखा उभा आडवा धरुन शेकून काढते.

गीता गजानन

आत्ता त्या फडक्याने माझे हात,पाय सरळ ठेऊन बाहुल्यासारखं गच्च बांधणार,माझ्या डोक्याला टोपरं बांधणार.

 आई मला दुधू देणार.मग मी गाई करणार.

रात्री नाईट मारायचीय मला.😉

टाटा.☺️

--------गीता गरुड.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरी गोम

ताई, धर माझे पाय!

ए पिस ऑफ वेलवेट