मैत्रीचे झाड

 © गीता गजानन गरुड.

आंब्रड.


मैत्रीचे झाड


एक छोटीशी नकोशी कचर्याच्या ढिगात कोणीतरी टाकलेली.

सकाळीच कचरा गोळा करणार्या माणसांना दिसली.

तिच्या बाजूला गल्लीतले कुत्रे बसून जणू तिचं रक्षण करत होते.

तिच्याकडे एकटक बघत बसलेले.

नाहीतर नेहमी कचर्याची गाडी आली की मच्छीच्या घाणीसाठी धावणारे,एकमेकांशी मारामारी करणारे हेच का ते कुत्रे?कचरेवाल्यालाही नवल वाटलं त्यांच्यातल्या दयाळूपणाचं.


फुलं विकणारी गुलाबी आपली फुलांची टोपली नुकतीच घेऊन चालली होती.

आज तिला अंमळ उशीरच झालेला.

नेहमीचीच पाण्याची गडबड.

नळावरची भांडणं.

काहीबाही बडबडत चाललेली.


तितक्यात तिचं लक्ष त्या गर्दीकडे गेलं.

जवळ जाऊन त्या तान्ह्या पिलाला पहाताच तिच्यातलं आईपण जागं झालं.

गेली दहा वर्ष समाजानं तिला वांझ म्हणून हिणवलं होतं.

प्रयत्नांची पराकाष्ठा करुनही तिच्या पोटी प्रेमाचा अंकुर फुटत नव्हता.

आणि इथे कुणीतरी तोच अंकुर नकोसा झाला म्हणून सहज फेकून देऊन वाटेला लागलेलं."इतकं सोप्प असतं आपल्या हाडामासाचं बाळ असं कचर्यात फेकून देणं?असलं तर असेल बा शिकलेल्यांना.

आमा अडाण्यांचकाळीज येवढं दगडाचं न्हाय," ती मनाशीच म्हणाली.

पटकन फोन लावून तिने आपल्या नवर्याला बोलावून घेतलं.


कागदोपत्री सह्या करुन ती मुलगी तिने आपलीशी करून घेतली.

चार बायका बोलावून बाळाला पाळण्यात घातलं.बाळाचं नाव दुर्गा ठेवलं.

जयराम,तिचा नवरा याने ओळखीच्या गायवाल्याकडे दुर्गासाठी दुधाचा रतीब सुरु केला.वाटी चमचा गरम पाण्यात उकळून गुलाबी दुर्गाला दुध भरवायची.

न्हाऊमाखू घालायची.

पावडरतीठ करायची.

गुलाबीची सासूही दुर्गाचे लाड करी.


आपल्या बोबड्या बोलांनी दुर्गाने चाळीतल्या सगळ्या कष्टकर्यांना आपलेसे केले.

थोडे दिवसांनी दुर्गाला आजीकडे ठेऊन गुलाबी फुलं विकायला जाऊ लागली.

शेवटी हातावरचं पोट.

आत्ता तिला दुर्गाच्या भविष्याचीही तरतूद करायची होती.

जयराम व गुलाबी दोघे मिळून भरपूर कष्ट करु लागले.


दुर्गा हळूहळू मोठी होऊ लागली.

चाळीतल्या सगळ्या तिच्या आई झाल्या होत्या.

बोलकीच होती ती.

आजीबरोबर देवळात जाई.

तिथे अभंग ऐके.


जवळच्या शाळेत गुलाबीने तिचे नाव घातले.

आत्ता कागदोपत्री ती कु. दुर्गा जयराम बोरे झाली.

शाळेत दुर्गा बडबडगीते शिकी व घरी आली कीओट्यावर बसून लहान मुलांना घेऊन तिची शाळा सुरु होई.

फुलपाखरू

छान किती दिसते फुलपाखरू

या वेलींवर फुलांबरोबर

गोड किती हसते फुलपाखरू.....


या बाई या 

बकुळीच्या झाडाखाली फुले वेचूया

ऊन पडले

पान-फुल दिसे कसे गोडगोडुले

गोडगोडुले

मोतियाचे दाणे कुणी खाली पाडले....


अश्या छान छान कविता ती चाळीतल्या इतर लहान मुलांना शिकवी.

कष्ट करुन दमलेल्या बायाबापड्या तिची ही गाणी कौतुकाने ऐकत.

मग तिला अजूनच हुरुप येई.

दिवस भर्रकन उडून जात होते.


आत्ता दुर्गा सातवीत गेली तशी गुलाबी संध्याकाळची तिला आपल्याबरोबर गजरे,फुलं विकायला नेऊ लागली.

दुर्गा तिथेच दिव्याच्या प्रकाशात बसून आपला घरचा अभ्यास पूर्ण करे.

वाचन,पाठांतर करे.

गुलाबीलाही कामात मदत करे.

गुलाबीचं बघून तिलाही आत्ता गजरा,वेणी,हार बनवता येऊ लागले होते.

गजरे बनवताना ती अभंग म्हणे,

मोगरा फुलला,मोगरा फुलला

फुले वेचिता वेचित बहरासी आला

मोगरा फुलला मोगरा फुलला

इवलेसे रोप लावियले द्वारी

तयाचा वेलू गेला गगनावरी....


सिग्नलला गाड्या थांबल्या की ती व तिची आई गजरे विकी. 

तिथेच तिची ओळख तिच्याच वयाच्या गोर्यागुलाबी रेवाशी झाली.

रेवा नेहमी तिच्याकडून गजरा घेई व कारमधल्या छोट्याशा बाप्पाला वाहे.

सिग्नल सुटेपर्यंत त्यांच्या गप्पाही होत.हळूहळू या दोघीही मोठ्या झाल्या.तारुण्यात आल्या.

दुर्वाने आत्ता कला महाविद्यालयात प्रवेश घेतला होता.

रेवाही तिच्याच वर्गात होती.

त्या दोघींची मैत्री प्रसिद्ध होती.

दोघी मिळून गाण्याच्या स्पर्धेत, एकांकिकेत भाग घेत.

दुर्वा कधीकधी संध्याकाळी रेवाकडे अभ्यासाला जाई.

एकदा रेवाच्या आजीची अंगठी हरवते.

सर्वजण दुर्वाकडे संशयाचे बोट दाखवतात.

दुर्वा आजीच्या अंथरुणातली तिची अंगठी शोधून देते व रेवाच्या घरच्यांना ठणकावून सांगते.

आम्ही गरीब आहोत पण चोर नाही.

माझ्या आईवडलांनी माझ्यावर चांगले संस्कार केले आहेत.

ती परत त्यांच्या घरी जात नाही पण त्यामुळे त्यांच्या मैत्रीत तसूभरही फरक पडत नाही.


दुर्वाला लहानपणापासून बकूळफुलं फार आवडत.

काँलेजच्या आवारात बकुळीचं झाड होतं.

तिथे रेवा व दुर्गा बसून बकुळ फुलं निवडत.

फुलं वेचतानाचं या बाई या गाणं मात्र बदललं होतं आत्ता.

आत्ता ती गाई..

बकुळीच्या झाडाखाली निळ्या चांदण्यात

ह्रद्याची ओळख पटली सुगंधी क्षणात

त्या सगळ्या बकुळफुलांची शपथ तुला आहे.

मनातल्या मोरपिसाची शपथ तुला आहे.

दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे.

मग झाडाखाली बसून ती फुले दोर्यात गुंफून लांबसडक वेणीत माळीत.


प्रोफेसर विक्रांत व प्रोफेसर रवी तिथेच बाकावर डबा खायला बसायचे.या मुली त्यांच्या मनात घर करु लागल्या.

ते रोजच तिथे येऊन बसू लागले.

या मुलींशी गप्पा मारु लागले. 

 रेवा व गुलाबी दोघींनाही विक्रांतच आवडू लागले.

जेंव्हा दुर्वासमोर रैवा तिच्या मनातलं सांगते,तेंव्हा मोठ्या मनाने दुर्वा विक्रांतचा विचार मनातून काढून टाकते.

रेवा तिच्या घरच्यांना विक्रांतबद्दल सांगते.

पण तिच्या घरचे तिला परवानगी देत नाहीत. 

खेडेगावातून आलेला विक्रांत त्यांच्या तोलामोलाचा नसतो.

ते लवकरात लवकर रेवाचं लग्न श्रीमंत घराण्यातल्या मंदारशी लावून देतात.

रेवाही गुपचुप लग्नाला तयार होते व दिल्या घरी समरस होते.


विक्रांत गुलाबीच्या घरी जातो व रीतसर दुर्वाला मागणी घालतो.

गुलाबी व जयराम त्यांच्या लग्नाला होकार देतात.

वैदिक पद्धतीने त्यांच लग्न होतं.

रेवाला आत्ता दुर्वाचा राग येऊ लागतो.

रेवा तिच्याशी नीट बोलेनाशी होते.

दुर्वा याबत विक्रांतशी बोलते.तो तिला धीर देतो की हळूहळू सगळं नीट होईल.


मध्यंतरी पुण्याला जाताना रेवाचा जबरदस्त अपघात होतो.

बरंच रक्त जातं.तिला तिथल्या इस्पितळात भरती करतात.

रेवाचा रक्तगट फार दुर्मिळ असतो.

रक्त जमा करणं फार निकडीचं असतं.

सगळे नातेवाईक आपलं रक्त द्यायला तयार होतात पण रक्तगट जुळत नाही.

दुर्वाला हे कळताच ती त्वरित निघते.

काँलेजमध्ये झालेल्या तपासणीमुळे तिला माहित असते की तिचा व रेवाचा रक्तगट एक आहे.


आवश्यक तपासण्या करुन डॉक्टर दुर्वाचं रक्त घेतात व रेवाला चढवतात.

रेवा जेंव्हा शुद्धीत येते तेंव्हा विक्रांत तिला दुर्वाने तिला रक्त दिलं त्यामुळे तिचे प्राण वाचले हे सांगतो.

रेवाच्या डोळ्यांना पश्चातापाच्या धारा लागतात.

रेवा व दुर्वाच्या मैत्रीचे झाड नव्या जोमाने बहरु 

लागते.👩👧

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरी गोम

ताई, धर माझे पाय!

ए पिस ऑफ वेलवेट