आजी पाहिजे..
आजी पाहिजे
मोना, आज बॉसच्या घरी पार्टी आहे. अगदी सुंदर तयार हो. बघताक्षणी सगळ्यांचे डोळे दिपले पाहिजेत.
यस डार्लिंग.
संध्याकाळी, मोनाने पर्ल व्हाइट कलरचा गाऊन परिधान केला. खांद्यावर रुळणारे कुरळे केस विंचरले. हलकासा मेकअप केला. गळ्यात एक प्लेटीनमची चेन..जिच्या पेंडंटमध्ये हिरा चमकत होता,त्याच डिझाइनचं ब्रेसलेट व इयररिंग्स. राजनेही पर्ल व्हाइट कलरची शेरवानी घातली होती व गळ्यात सोन्याचा गोफ शोभून दिसत होता त्याला. लहानग्या ईशाला कामवाल्या मावशीकडे सोपवून दोघंही पार्टीत पोहोचली.
मनोज साहेबांच्या आईच्या वाढदिवसानिमित्त सोहळा आयोजित केला होता. मनोज व उर्मी आईला स्टेजवर घेऊन आले. सोबत त्यांची लेक आर्या होती. साहेबांच्या आईकडे पाहिलं नि मोना व राजला वाटलं आता धरती दुभंगावी व तिने त्यांना पोटात घ्यावं. याला कारणही तसंच होतं.
धोत्रे कुटुंब ..दादरच्या चाळीत रहाणारं..श्री.धोत्रे मिलमधे कामाला होते. त्यांच्या बायकोला सगळे जीजी म्हणायचे. या दोघांच्या संसारवेलीवरची फुलं म्हणजेच राज व रंजना. मिलमधे,श्री.धोत्रेंचा हात साच्यात अडकला. हाताची बोटं अपंग झाली. धोत्रेंना कामावरून कमी करण्यात आलं. जीजींपुढे आव्हान होतं,संसाराचा गाडा रेटण्याचं.
घरात सासूसासरे होते. त्यांचं औषधपाणी पहायचं होतं जीजी पहाटे उठून घरातली सगळी कामं आवरायची,स्वैंपाक करुन ठेवायची. मुलांना शाळेत सोडून एका पोळीभाजी केंद्रात पोळ्या लाटायला जाऊ लागली. तरी हातातोंडाची गाठ घालणं कठीण होऊ लागलं.
श्री. धोत्रेंनी अगरबत्ती विकायला सुरुवात केली.
घाऊक बाजारातून अगरबत्तीची पाकिटं आणून गर्दीच्या वेळेला रस्त्यावर उभं राहून विकू लागले. मुलं मोठी झाली. उच्चविद्याविभूषित झाली. वयोपरत्वे जीजीच्या सासूसासऱ्यांनी जगाचा निरोप घेतला.
दोन्ही मुलांनी प्रेमविवाह केले. रंजनाचा नवरा हा तिचा ऑफिसातला बॉस होता तर राजची मोना त्याच्या मित्राची बहीण होती. मोनाचं माहेर श्रीमंत होतं. वन रुम किचनमधे मोनाचा जीव घुसमटू लागला. शेवटी ती राजला घेऊन उंबरठ्याबाहेर पडली.
पुढे वाचा-

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा