निर्याज पिरेम(अंतिम भाग)


 निर्याज प्रेम ( अंतिम भाग)


https://geetagajanan11.blogspot.com/2021/05/blog-post_5.html


"खयच्या तरी देवाक तरी इचारा नि त्या रेवतेचो बंदोबस्त करुक सांगा..बाकी कायव करना तडे पन आमच्या झिलाक सोडूक व्हया त्याना."--बाळग्याची आजी बोलली.


"असला पिरेमाचा भूत येकदा मानेर बसला काय निघता निघत नाय. तरुणपणात गाढवीणसुदीक सुंदर दिसता." बाळग्याचो मामा बोललो.

-----------------------------------------------------------------------


"बरा जावयांनू इलास ते चार दिस रव्हा. आमकाव कायतरी खाटखूट करुन घालुदे तुमका."--बाळग्याचे आजे.


"चार दिस काय जमाचा नाय. बाळग्याक बोललय दोन दिसात येतय तुज्या आवशीक घेऊन म्हनान जाऊक दिल्यान."--अन्ना


"आमचे मालूताईशिवाय चैन पडना नाय वाटता भावजींका."--नलू अन्नांची थट्टा करुक लागला.


"नलग्या,तुजो झिल लग्नाचो झालो..वरीसभरात सासू होशीत..आनि तेच्या फुढल्या वर्षाक आजी होशीत नि मस्करी कित्या करतस पावन्यामानसाची!"-- बाळग्याचे आजे लेकीक करवादले.


मामाच्या दोन झिलांनी कोंबो पकडल्यानी,साकटवल्यानी. अन्नांका सासयेन चुलीत भाजलला खराटसा काळीज दिल्यान करटेतसून..तिखटसो रस्सो पिऊक दिल्यान. रस्सो अंगात गेल्याबरुबर अन्नांका येकदम हुशारी इली. सैपाकघरात मालू,नलू वडे थापित व्हत्या नि आजुबाजूची जाणती मोमयतल्या जावयावांगडा गजाली मारुक येऊन बसलली. बाळग्याच्या मामीन तेंका चाय न्हेऊन दिली नि वडेव दिले खाव्क.


अन्ना शेजाऱ्यांका सांगित व्हते,"कितकोव पैसो भायरच्या जेवनाक घाला..घरातला ता घरातला. आता कोंबडीवडे म्हनान डिश देतत हाटलात. लाल भगवनी पानी,दोन फोडी नि चार वडे..तेव भोकाचे..आपल्याहारी खय करतत भोकाचे वडे..पन मालवनी जेवान म्हनान कायव खपवतत."


वायच सेकान सगळी आपापल्या घराक जाऊक गेली. घरातल्यांची फकस्त कांदे,निंबा कापूची रव्हली होती. मामा बोलवूक इले तसे अन्नांनी पाठल्याहाराक जाव्न हातपाय धुतल्यानी नि जेवूक बसले. सुक्या मटनात जावयासाठी दोन अंडी उकडून घातलली. रस्सो,वडे नि सागोती..अन्ना पॉट भरंसर जेवले. सासू इचारुन इचारुन आनि आनि वाढीत होती. शेवटाला मोठ्या गिलासभर कोकमकढीने जेवनाची सांगता झाली. 


बाबल्याच्या आव्शीन दांडयेर वाळत घातलल्या कपड्यातले आपले कपडे शोधून काढल्यान नि घड्या घालून बेगेत भरुक लागली. दुसरे दिशी रातीची टिरेन पकडूची व्हती. दुसरे दिशी कामा व्हती..काजी चार भाजूक व्हये होते बाळग्यासाठी,लोंच्यासाठी तोरा काढूची होती बरीसी बगून. बाकी तांदळाचे,पीठाचे गठलेमुठले म्हातारी बांधनार होती.


----------------------------------------------------------------------


राती कामारसून इल्यानंतर बाळग्यान पिठी ढवळल्यान,येका कवठाची पोळी केल्यान,कुकर लावल्यान नि जेवलो,भांडी घासून ठेवल्यान. चार दिस मासे गावाक नाय तेकारनान तेचो जीव निसतो चिटमिटा होतो. 


बाळग्याक सुसल्याची आठवन इली..सुसला तेदिशी गेला ता इलाच नाय..रेवती वायच जास्तच बोलला तेका..रेवती माज्यावरल्या पिरेमाखातीर बोलला तसा..हेना मनाक कित्या लावून घेऊक व्हया हुता! वायच माशाची कढी हाडून दिल्यान आसती ती नाय झाली..बाळगो चुकचुकत रव्हलो.


राती खाली गेलो फिराक..रेवतीच्या घराखाली उभ्या रव्हान दोन शिटये मारल्यान नि तळ्यार ठरलल्या बाकड्यार जाऊन बसलो. धाइस मिनटान रेवती इला.


"इतको उशीर!"--बाळगो चिडलो.


"अरे हनी काय करु घरात थोडा प्रोब्लेम झालाय पैशाचा. तुला फोन लावणारच होते पण मग म्हंटलं भेटल्यावरच बोलू. माझ्या काकाचा एकसिडंट झालाय. पप्पांना लाखभर रुपये घेऊन बोलवलय उद्या. तू असं करना माझ्या अकाऊंटवर उद्या एक लाख रुपये ट्रान्सफर कर प्लीज."--रेवती


"आगं पण.."


"का माझ्यावर भरवसा नाही तुला? नाहीतरी आपलं लग्न झालं की तुझे सगळे पैसे माझेच होणारैत मग आताच देना थोडेसे."--रेवती


"अग़ो पन मला आईअन्नांका इचारुक व्हया. ती दोघाव माझ्या मामाच्या गावाक गेली हत. थांब वायच.."--बाळग्या


"हेच का तुझं माझ्यावरचं प्रेम! आपलं लग्न झाल्यावरही तू सगळं तुझ्या आईअन्नांना विचारुनच करणार? तुला तुझी स्वत:ची मतं नाही की माझ्यावर विश्वास नाही! चल बाय मी जाते. कळलं तुझं प्रेम."


"ए राणू माजा वायच आयकान तर घे. मी पैसे ट्रान्सफर करतय..अजून लागले तरी माग हक्कान पन रागेव नको ना तुझ्या शोन्यार."


"ओ डार्लिंग."असा म्हनीत रेवती बाळग्याचे मिठीत शिरला. थंडगार वारो,सळसळणारी झाडा,तलावाचा हलनारा पानी नि तेच्यात डोकावनारो आभाळातलो चंद्रम..सगळोच सीन कसो सिनेमासारो. बाळगो नि रेवती भान हरपून एकमेकांच्या मिठीत इसावतत..वायच सेकान थयलो वाचमन दांडको हलइत येता नि बेसावध बाळग्याच्या पाठीत दांडको मारता तसा ता जोडा इलग होता नि बाळगो नि रेवत्या थयसून धावत सुटतत. 


दुसरे दिसी बाळगो रेवतीच्या खात्यार पैसे ट्रान्सफर करता. रेवती तेका💕💕😘😘असा काय काय पाठवता. बाळगो यकदम खूष. 


दुसऱ्या दिसी रातीच्या गाडीत अन्ना नि मालू बसनार इतक्यात लाक डाऊन झाला असा जाहीर होता. मगे काय परत घराकडे जातत. 


बाळग्याक फोन लावून सांगतत..लॉक डाऊन संपपातूर येव शकत नाय असा. बाळग्याच्या डब्याचे वांदे,जेवनात तेका गोडीडाळ नि पिठी येवढाच काय ता येय. रेवत्यान येकदोनदा बेसनचा पिठला,बेसन शिवरुन,कूट घालून केलली भाजी हाडून दिल्यान पन हेच्या नरड्याखाली तसली भाजी जायना. 


मगे काय भायरच वडोपाव,समोसा,..खावून जीव जगवूक लागलो बिचारो. मधल्या काळात आजून लाखभर रुपये रेवतीच्या खात्यार घरगुती कारनासाठी म्हनान बाळग्यान ट्रान्सफर केल्यान. 


आता तेचे खात्यारव पन्नासेक हजारच रवले. तेना रेवतीक सांगल्यान.."दोनच वरसा झाली  माका नोकरीक लागून..तेकारनान लय मोठी सेविंग नसा माजी पन मग ता लोन काढून हौसी पुरव सांगाक लागला. 


बाळग्याच्या घरात लोनबिन घेऊन कधी काय केलला नव्हता नि अन्नांचीव भीती होती त्याका तेकारनान बाळग्यान रेवतीक पैसे देऊक नकार दिलो. रेवती खट्टू झाला. 😍😘😘ह्यातला कायच सेंड केल्यान नाय.. नि फोनव करुचा बंद झाला. बाबलो येड्यासारो झालो. तेना मेसेजेसवर मेसेजेस केल्यान,कॉल केल्यान काययेक उपेग नाय झालो. 


बीएमसीत असल्याकारनान बाळग्याक कामार जावचाच लागा.   मधी ट्रेनव बंद हुते,तेकारनान बसच्या गर्दीतसून जावचा लागा आनि जेची भीती होती ताच झाला. 


सडकून ताप इलो बाळग्याक. बाळग्यान क्रोसिन घितली नि निजान रव्हलो. दोन दिस झाले तरी ताप जायना..घसोव दुखाक लागलो,डोक्या धरला..तसा कामावरच त्याना तपासून घितल्यान तर रिपोर्ट पॉझिटिव्ह इलो. 


बाळग्यान घरातच सवताक क्वारंटाईन करुन घितल्यान. बिल्डींगीतल्या व्हॉट्सअप ग्रुपार मेसेज पाठवल्यान..तो मेसेज सुसल्यान वाचल्यान मातर तेच्या पायाबुडाची जमीनच निसटताहासा वाटला तेका..


सुसल्यान वायच तांदूळ घालून पेज केल्यान नि तो डबो बाळग्याच्या दाराफुडे नेऊन ठिवल्यान..बाळग्यान डबो उचलल्यान नि सुसल्याक हात जोडून नमस्कार करुक लागलो. 


बाळग्यान खाल्लली भांडी घासना,तेका पथ्याचा कायनुमायनू करुन घालना,तेका जास्तीच त्रास झालो तर डाक्दरांथय जावन सांगून गोळये हाडना,तेका गरम हुनहुनीत पानी,हळदीचा दूध करुन देना ह्या सगळा काम सुसल्यान पंधरा दिस केल्यान. पंधरा दिस तिचा पार्लरचा कामव तिका बंद करुचा लागला.


रेवती सांडावशीसुदी फिरकाक नाय.बाळग्याचो जीव जगवल्यान तो सुसल्यान. बाळगो बरो झालो तसो बिल्डींगीत सुसल्याचो कौतुक सोवळो ठेवलो होतो. बिल्डींगकरांनी सुसल्याक पुष्पगुच्छ नि भेटवस्तू दिल्यानी. तिच्या धीराचा,सेवेचा कौतुक केल्यानी.


 बाळग्याच्या मनातव बराच बोलुचा व्हता पन शब्दच खयते गावत नव्हते नेमके त्याका. तेच्या डोळ्यांतले भाव सुसल्यान वाचल्यान मातर तिका भरुन पावल्यासारा झाला. तेच राती बाळगो दुखन्यातसून उठलो म्हनान सुसल्याच्या आवशीन तेका पोळये नि मटान रानून घातल्यान. 


राती बाळगो घराक निजाक जानार इतक्यात तेचे व्हॉट्सऍपार धाबारा फोटू तेचे मित्रान पाठवले. येक येक फोटू बघान बाळग्याचे नजरेत अंगार इलो. बरोबर ओळखलास तुमी. रेवतीचे फोटू होते ते. आता तिना दुसरो सावज पकडलेलो नि तेचेवांगडा राती ताच तळा,ताच बाकडा,तिच सळसळणारी झाडा,ताच हलनारा पानी,आभाळातसून डोकावनारो चंद्रम.. मातर वांगड येगळो..


बाळग्याक काय झाला ता परत सुसल्याकडे धावलो. तिचे हात हातात धरल्यान नि बोललो,"सुशिला,तुजे प्रेमाचो मी अपमान केलय. तुका कमी लेखलय. तुया सगळा इसरान माका ही म्हामारी झाली तरीबी माजो साथ सोडलस नाय. तुज्यामुळेच आज मिया कोरोनातसून भायर इलय. समोर लक्ष्मी आसताना मिया अवदसेहारी धावी होतय. शक्य झाला तर माका माफ कर. 


इतक्यात बाळग्याचे मित्रव इले..म्हनाक लागले.."माफी अशी तशी नाय मिळाची. सुशिलावांगडा लगीन करुचा लागतला तुका. आमका हीच वैनी व्हयी..ती पैसे घेऊन पळान जानारी नुको."


सुसला ह्या आयकान लाजला. आपल्या सेवेन सुसल्यान तिचा पिरेम परत मिळवला. 


थोड्या दिसान बाळग्याचे आव्सबापूस घराक इले. पन्नास मानंसांच्या उपस्थितीत बाळग्या नि सुसल्याचा शुभमंगल सावधान झाला.


समाप्त.🙂🙏

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरी गोम

ताई, धर माझे पाय!

ए पिस ऑफ वेलवेट