शिवा


#शिवा



कोल्हापुरातील, एका खेड्यात एक कुटुंब रहात होतं.दोघं नवराबायको..जिवबा व सीता, एक म्हातारी आई,एक मुलगा व एक मुलगी असं..एक छोटा जमिनीचा तुकडा होता..पुर्वजांपासून चालत आलेला.तो कसायची..आपल्या तुटपुंज्या कमाईत ती खुश होती.


दरवर्षी गावात जत्रा यायची.सीता मुलांना जत्रेला नेत नसे कारण जत्रेत नेलं तर खेळणी,..खाऊ त्यांना देण्यापुरते बिचारीकडे पैसेच नसायचे..एका वर्षी तिने ठरवलं मुलांना जत्रेत न्यायचंच.त्यासाठी आधी चार महिने थोडीशी पैशाची साठवासाठव केली.

मुलंही जत्रेला जाणार म्हणून खूप खूश झाली.त्यांच्या चेहर्यावरचा तो आनंद पाहून सीतेला आभाळ ठेंगणं झालं.


जीवबा म्हणाला,"जाताय तर जावा.पण लवकर येवा.जीव टांगणीला नको लावू.म्हातारी सारखी इचारीत र्हानार."दुपारी सीताईने भाकर्या भाजल्या.मिरचीचा खर्डा सोबत घेतला.सासूचं व नवर्याचं जेवण झाकून ठेवलं.शिवाला व सईला तयार केलं


लेकरांना घेऊन रस्त्यावर येऊन उभी राहिली..एक  ट्रक जात होता.त्याला हात दाखवला.ट्रकवाला गावातलाच रशीदचाचा होता.त्याने ट्रक थांबवला.सीताई व सई मागे बसल्या.ल्हानगा शिवा खिडकीजवळ बसला.अजून काही माणसंपण चढली ट्रकमध्ये.ट्रकने वेग घेतला.. आता जत्रेच ठिकाण जवळ आलं होतं..तितक्यात विपरीत घडलं..


ट्रकच्या खिडकीचा दरवाजा उघडला गेला व शिवा ट्रकमधून खाली पडला.पाठीमागून येणारी भरधाव गाडी शिवाच्या पायांवरुन गेली.डोळ्याची पापणी लवते न लवते तोच अनर्थ घडलेला.सीताईने गडबड कसली म्हणून वाकून पाहिलं तर रक्ताच्या थारोळ्यात निपचित निजलेला शिवा तिला दिसला.त्याची काहीच हालचाल होतं नव्हती.


आजूबाजूची लोकं हळहळत होती..पोरगं गेलं म्हणत होती..ट्रकवाल्या रशीदने त्याला तसाच उचलून सीटवर ठेवला व ट्रक इस्पितळाकडे वळवला.लगेच शिवाला आयसीयुत दाखल केलं..रसीदचाचाने सगळी जवाबदारी उचलली.शिवाच्या बाबाला ,जीवबाला कळवलं.तो म्हातारीला शेजारणीकडे सोपवून निघाला.पोराला आयसीयुत बघून जीवबाच्या काळजाचं पाणी पाणी झालं..शिवाचे दोन्ही पाय काळाने हिरावून नेले..


शिवाला घेऊन आठवड्याभराने शिवाचे आईवडील घरी आले.दोघांच्या डोळ्यातलं पाणी खळत नव्हतं.काळाने मोठी शिक्षा केली होती..महिनाभरात शिवा थोडा सुधारला.आई सर्वतोपरी सेवा करत होती.मित्र त्याला उचलून मैदानावर घेऊन जात..व एका खुर्चीवर बसवत.इतरांना खेळताना पाहून छोट्या शिवाचे उरलेले पायाचे अवयव हुळहुळत..


पण शिवा खूपच सकारात्मक होता.मुलांना खेळायला उत्तेजित करायचा.त्यालाही थोडं बरं वाटायचं..गुरुजींनी त्याला शाळेत येण्याची परवानगी दिली.मग काय त्याचे दोघे मित्र त्याला दोन्ही बाजूला खांद्यात धरून घेऊन जायचे.शिवा मन लावून शिकत होता.त्याची बुद्धीही तेज होती.


दहावीत शिवा जिल्ह्यात पहिला आला..पुढचं कोलेज मात्र गावापासून बरंच दूर होतं..तेंव्हा शिवाच्या वडलांनी त्याला जिल्हयाच्या कोलेजला घातलं.बाजूलाच वसतिगृह होतं..रशिदचाचाने खटपट करून त्याला क्रुत्रिम पाय आणून लावले.इथेही शिवाला चांगले,गुणी मित्र मिळाले.


शिवा बारावीत चांगले गुण मिळवून पास झाला.जेइइत मिळवलेल्या दैदिप्यमान यशामुळे त्याची आयआयटी मद्रास येथे निवड झाली.तिथेही त्याने त्याच्या स्वभावाने सर्वांना आपलेसे केले.गावातल्या गावकर्यांनी मिळून त्याच्या शिक्षणाच्या फीची व्यवस्था केली.त्याच्याच बँचमधल्या सायलीचे त्याच्यावर प्रेम जडले.सायलीने घरच्यांच्या विरोधात जाऊन शिवाबरोबर लग्न केले.


दोघंही उत्तम पदावर रुजू झाली.त्यांना एक छान मुलगीही झाली..वेदा नाव ठेवलं तिचं..जीवबा व सई सुखावले..

गावकर्यांचे उपकार शिवा विसरला नाही.त्याने गावात नवीनशाळा,कोलेजउभारले,वाचनालय,उभारले.. अद्ययावत इस्पितळ उभारणीसाठी फंड जमवू लागला.


आत्ता शिवा विविध नामवंत कोलेजेसमध्ये उत्तेजनपर लेक्चर देतो.त्यात तो म्हणतो,"माझे हे पाय गेले..ते एकाअर्थी बरेच झाले..त्यामुळेच तर मला जीवनाच्या पाऊलवाटेवर जीवाला जीव लावणारे मित्र मिळाले..नक्षत्रासारखी पत्नी मिळाली"..🌷🌷

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरी गोम

ताई, धर माझे पाय!

ए पिस ऑफ वेलवेट