छोटीशी आशा लिंक मिळवा Facebook X Pinterest ईमेल अन्य अॅप्स - फेब्रुवारी ११, २०२४ https://www.facebook.com/share/p/ZEx5rAaBVEPfkJWL/?mibextid=2JQ9oc लिंक मिळवा Facebook X Pinterest ईमेल अन्य अॅप्स टिप्पण्या
खरी गोम - फेब्रुवारी १६, २०२३ खरी गोम ©®गीता गरुड. छाया सासरी आल्यापासनं बघत होती. नणंद रजनी कामाच्यावेळी बरोबर पसार व्हायची. काम म्हंटलं की तिचं डोकं धरायचं. छायाची सासूही लेकीचे अति लाड करायची. लेकीला जरा बरं नसलं तरी अस्वस्थ व्हायची. रजनी आपल्या आईच्या हळवेपणाचा नेमका फायदा घ्यायची. छायाच्या सासूला आमवाताचा त्रास होऊ लागला. तिच्या हातापायाची बोटं आखडू लागली. मरणाची थंडी, त्यात छाया घराबाहेरल्या मोरीत एकटीच भांडी घासत बसायची. रात्रीची झाकपाक होऊन खोलीत जाईस्तोवर खूप उशीर झालेला असायचा. छायाचा नवरा विश्वास मग तिच्यावरच चिडायचा. "छाया, गो वाजले किती? बारा वाजेतागद भांडी घासीत रव्ह. पटापटा कामा आटपूक व्हता काय तुका! आता निजाचा कवा नि कामार जाव्चा कवा?" "तुमका काय वाटता, मिया आस्ते आस्ते कामा करतय. गोगलगाय असा काय मिया. भाकरी केलय, मासे सुटी केलय, भाजलय, सार केलय. टाईम लागताच नाय ओ समदा करूक. तेतूर लायटीर धाड भरली ती वाटुचाव लागला." "तवाच सार भारी झाललो. मिक्सरार अशी चव येना नाय." "सगळा खरा पन माकाव इतकी कामा करुची सवय नाय ओ. तुमच्या भयनीक रजनीक वायच हातबॉट लावूक सांगलास तर बरा हो... अधिक वाचा
ताई, धर माझे पाय! - मार्च ०३, २०२४ ताई, धर माझे पाय! ©®गीता गरुड. बारावीची परीक्षा सुरू झाली. नेहाला बिल्डींगमधील साऱ्या काकाकाकूंनी येऊन शुभेच्छा दिल्या होत्या. नेहाच्या आईने किराणा, दळण सारं आणून ठेवलं होतं का तर नेहाजवळ थांबता यावं. तिला भूक लागली तर काहीतरी हलकंफुलकं घरातलं पौष्टीकसं करून देता यावं यासाठी थालपीठाची भाजणी, पातळ पोह्यांचा चिवडा अशी सारी जय्यत तयारी केली होती. नेहा अगदी मनापासून अभ्यास करत होती. तिचा छोटा भाऊ निखिल हा सहावीत होता. तोही ताईसोबत अभ्यासाला बसे. ताईच्या अभ्यासात व्यत्यय नको म्हणून कारटून अगदी हळू आवाजात पाही. नेहाताईचा रसायनशास्त्राचा पेपर होता. ताई परीक्षेवरून आल्यावर थोडी झोपली. आईने नेहा व निखिल दोघांनाही त्यांच्या आवडीचं मसालादूध करून दिलं. निखिल खाली खेळायला पळाला. नेहा अभ्यासाला बसली. एक दिवसाची मधे सुट्टी होती पण अभ्यासक्रमही खूप होता. सगळ्या धड्यांची उजळणी करणं गरजेचं होतं. नेहा अभ्यासाला बसली , तिने किती वेळात किती धडे करायचं सगळं आधी मनात आखून घेतलं आणि सुरूवात करणार इतक्यात जोरात बीट्स वाजू लागले..दिलदार मनाचं रुबाबदार..वाढीव तुमचा ह्यो कारभार..तुमचा येगळाच हाये... अधिक वाचा
ए पिस ऑफ वेलवेट - नोव्हेंबर ०२, २०२२ ए पिस ऑफ वेलवेट..सो रोमँटिक😍 ©®गीता गरुड. प्लेटफॉर्म/फलाट क्रमांक तीन. सखी फलाटावर पोहचलेय. आपल्या खास मैत्रिणीची प्रितीची वाट पहात आहे. प्रिती जिन्यावरनं झपझप पावलं उचलत फलाटावर आली. तिच्या नजरेने सखीला शोधलं व पावलं सखीकडे वळली. सखी: अगं प्रिती रोज टिकली लावणारी तू, आज टिकली लावली नाहीस ते गोल खूण दिसतेय बघ कपाळावर. अगदी टिकलीने शिक्कामोर्तब केलय तुझ्या भाळावर. प्रिती(कपाळाला बोट लावत): ही टिकलीपण ना टिकेल कपाळावर तर शपथ. बाकी कुठेही चिकटून बसण्यात हुशार ही बया. सखी: कोण बया? प्रिती: अगं टिकली गं. काल किनई यांचे चार मित्र आले होते आमच्याकडे. रविवार, सुट्टीचा दिवस.. हे दुपारी ताणून झोपले होते. मी यांच्या मित्रांना सरबत वगैरे दिलं, फराळही दिला बरं का नि यांना मिसकॉल दिले दोनतीन. हे डोळे चोळत आले घुश्श्यात मला ओरडायला. समोर मित्रांना पाहून लगेच एक्सप्रेशन्स चेंज. अगदी गालावरची खळी दाखवत गुड आफ्टरनून वगैरे. मित्र सुसाट हसत सुटले. दोघे तर लोळत होते फरशीवर. मी अचंबित. यांच्याकडे पाहिलं नि हास्यकारंज्याचं कारण उमजलं. माझी टिकली यांच्या खळीत अशी रुतून बसलेली. माझं बोट कपाळाकडे. ... अधिक वाचा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा